आमदार काळे यांच्या पुढाकारातून दीड कोटी खर्चाच्या ऑक्‍सिजन प्रकल्पास प्रारंभ - Oxygen project costing Rs 1.5 crore started through MLA Kale's initiative | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार काळे यांच्या पुढाकारातून दीड कोटी खर्चाच्या ऑक्‍सिजन प्रकल्पास प्रारंभ

मनोज जोशी
शनिवार, 15 मे 2021

आपल्या पाठपूराव्या प्रतिसाद देत जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.

कोपरगाव : जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दीड कोटी रूपये खर्चाचा 
ऑक्‍सिजन प्लॅन्ट उभारण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ऑक्‍सिजन टंचाई त्यामुळे कायमस्वरूपी दुर होईल. (Oxygen project costing Rs 1.5 crore started through MLA Kale's initiative)

आपल्या पाठपूराव्या प्रतिसाद देत जिल्ह्याचे पालक मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. सध्याच्या कोविड आपत्तीत ही मोठी उपलब्धी ठरेल, अशी माहिती आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी दिली. 

ते म्हणाले, की कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात या प्लॅन्टच्या पायाभरणीचे (फाऊंडेशन) काम सुरू झाले. उभारणीचे काम बारामती येथील फायरवेल टेक्‍नॉलॉजी ही कंपनी काम करीत आहे. पुढील एक ते दीड महिन्या हे काम पूर्ण होईल. त्यातून रोज 125 ऑक्‍सिजन सिलेंडरचे उत्पादन होईल. कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्‍सिजन बेडची तातडीने गरज भासणाऱ्या रूग्णांत फार मोठी वाढ झाली. त्यामुळे संपूर्ण देशभर ऑक्‍सिजन टंचाई निर्माण झाली. 

कोपरगावतही मोठ्या टंचाईला तोंड देण्याची वेळ आली. सध्या परिस्थीती सुधारली आहे मात्र हा प्लॅन्ट सुरू झाल्यानंतर हि टंचाई बऱ्यापैकी दुर होईल. 

कोविड रुग्णांना तालुक्यातच उपचार मिळावेत

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व गावातील प्रत्येक कोविड रूग्णाला शक्‍यतो तालुक्‍यातच उपचार मिळावेत. अशा पध्दतीने नियोजन करण्यात आले आहे. आपण पुढाकार घेऊन सरकारी यंत्रणेला पापीई किटपासून ते चाचणी किट पर्यत विवीध वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करीत आहोत. रोज आढावा घेतला जात असून आवश्‍यक त्या सुविधात वाढ करण्यावर भर दिला जात आहे.

- आशुतोष काळे, आमदार 

 

हेही वाचा...

पोहेगाव कोविड सेंटरचे काम प्रेरणादायी 

कोपरगाव : "कोरोना संसर्गाचे व मृत्यूचे प्रमाण वाढते असून, सरकार व प्रशासन युद्धपातळीवर कोविड नियंत्रणासाठी प्रयत्न करीत आहे. लोकसहभाग, योग्य नियोजन व पारदर्शक कामामुळे पोहेगावचे कोविड सेंटर जिल्ह्याला प्रेरणादायी आहे,'' असे प्रतिपादन शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. 

हेही वाचा...

जामखेडला होणार आॅक्सिजन प्लॅट

तालुक्‍यातील पोहेगाव येथे ग्रामपंचायत, पोहेगाव पतसंस्था व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभागातून सुरू केलेल्या, जिल्हा परिषद शाळेतील कोविड सेंटरची पाहणी करताना ते बोलत होते. शिवसेना नेते नितीन औताडे, सरपंच अमोल औताडे, ग्रामविकास अधिकारी रामदास काळे, तलाठी सोनाली विधाते, किरण चौरे, डॉ. घनश्‍याम गोडगे उपस्थित होते. नऊ वर्षांच्या कोरोनाबाधित मुलीसह रुग्णांशी खासदार लोखंडे यांनी संवाद साधला. पोहेगाव कोविड सेंटरमध्ये मिळालेल्या उपचारांमुळे आम्ही समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत 60 रुग्णांनी उपचार घेतले त्यांपैकी 25 जण बरे होऊन घरी परतल्याचे नितीन औताडे यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरना एकाच छताखाली जोडून ऑक्‍सिजनसह रुग्णवाहिका सेवा पुरविण्यासाठी व रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार लोखंडे यांनी सांगितले. सरपंच अमोल औताडे यांनी आभार मानले. 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख