अकोल्यात सव्वा कोटी खर्चाचा ऑक्‍सिजन प्लॅंट उभारणार : आमदार लहामटे

लवकरच ऑक्‍सिजन उपलब्ध केला जाईल. तालुक्‍यात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्ध झाली असून, अकोले येथील कोविड केंद्रास ती देण्यात आली आहेत.
kiran lahamte.jpg
kiran lahamte.jpg

अकोले :  तालुक्‍यात (Akole) एक कोटी 20 लाख रुपये खर्चून ऑक्‍सिजन प्लॅंट उभारणार असल्याची माहिती आमदार डॉ. किरण लहामटे (Dr. Kiran Lahamte) यांनी दिली. (Oxygen plant to be set up in Akola at a cost of Rs 15 crore: MLA Lahamate)

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""शिक्षकांच्या सहकार्यातून सुगाव खुर्द येथे 50 बेडचे ऑक्‍सिजनसह कोविड  सेंटर नुकतेच सुरू झाले आहे. त्यास ऑक्‍सिजन पुरवठ्याबाबत मी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानुसार लवकरच ऑक्‍सिजन उपलब्ध केला जाईल. तालुक्‍यात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्ध झाली असून, अकोले येथील कोविड केंद्रास ती देण्यात आली आहेत. तालुक्‍यात लवकरच एक कोटी 20 लाख रुपये खर्चून ऑक्‍सिजन प्लॅंट सुरू करण्यात येईल.'' 

या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, सुरेश गडाख, अमित नाईकवाडी, 
प्रा. चंद्रभान नवले, संतोष नाईकवाडी, संदीप शेणकर, अक्षय आभाळे, सूरज वाडगे उपस्थित होते. तहसीलदार मुकेश कांबळे यांनी, तिसरी लाट सुरू झाली असून, प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी, असे आवाहन केले. 

हेही वाचा...

हेही वाचा..

अकोल्यात रेमडेसिव्हिरची कमतरता 

अकोले : तालुक्‍यात सुगाव येथील आरोग्य केंद्रात एक दिवसापूर्वी दाखल केलेल्या दोन रुग्णांनी अखेरचा श्वास घेतला. तालुक्‍यात तीन दिवसांपासून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची कमतरता असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ पुन्हा सुरू झाली आहे. 

नगर जिल्ह्यात इंजेक्‍शन नसल्याने तालुक्‍यातही ते उपलब्ध होत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. कोव्हॅक्‍सिन लसही उपलब्ध नसल्याने, ज्येष्ठ नागरिकांना इंजेक्‍शनसाठी वाट पाहावी लागत आहे. आदिवासी भागात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत असून, राजूर येथील कोरोना काळजी केंद्रात राजूरचे 14, चिचोंडी 1, सावरकुटे 2, कातळापूर 1, केळुंगण 1, चिंचावणे 2, विठे 3, वारुंघुशी 1, लव्हाळी 1, तसेच शिरपुंजे येथील 1, असे 27 रुग्ण उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयात अधिक रुग्ण उपचार घेत असल्याने तालुका प्रशासनावर ताण आला आहे. 

तपासणी किटच्या उपलब्धतेसाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सातत्याने नगरशी संपर्क ठेवला आहे. तालुक्‍यात आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असून, त्याबाबत स्थानिक नेत्यांनी आरोग्यमंत्र्यांशी संपर्क केला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभिरे यांनी कोरोनाबाबत माहिती दिली. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com