रायगड जिल्ह्यातून नगरला ऑक्‍सिजन - Oxygen to the city from Raigad district | Politics Marathi News - Sarkarnama

रायगड जिल्ह्यातून नगरला ऑक्‍सिजन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 एप्रिल 2021

रायगड जिल्ह्यातील तळोजा एमआयडीसीतून 20 के. एल. (20 टन) ऑक्‍सिजन उपलब्ध झाला आहे.

नगर : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची उपचाराच्या संख्येने 24 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गंभीर कोरोना रुग्णांना कृत्रिम ऑक्‍सिजनची गरज आहे. जिल्हा प्रशासन ऑक्‍सिजन मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रायगड जिल्ह्यातील तळोजा एमआयडीसीतून 20 के. एल. (20 टन) ऑक्‍सिजन उपलब्ध झाला आहे, अशी माहिती नायब तहसीलदार तथा ऑक्‍सिजनचे नोडल अधिकारी प्रशांत गोसावी यांनी दिली. 

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालयातील ऑक्‍सिजनची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात ऑक्‍सिजन मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. 

चाकण (पुणे) एमआयडीसीतून ऑक्‍सिजन काही प्रमाणात उपलब्ध होत आहे. राज्यातील कोळंबोली (पनवेल) येथून विशाखापट्टणम येथे विशेष रेल्वे पाठवून ऑक्‍सिजन आणण्यात आला. या ऑक्‍सिजन रेल्वेतून नगर जिल्ह्यासाठी दोन टॅंकर उपलब्ध झाले होते. नाशिक येथील देवळाली रेल्वे स्थानकातून हे टॅंकर आणण्यात आले. या पैकी एक टॅंकर संगमनेर तर दुसरा टॅंकर नगरला देण्यात आला. तळोजा एमआयडीसीतून 20 के.एल. क्षमतेचा एक ऑक्‍सिजन टॅंकर उपलब्ध झाला. नगरला हा ऑक्‍सिजन मिळाला आहे. 

 

हेही वाचा...

रुग्णांचे प्राण वाचविण्यात लोढा बंधूंची महत्वपूर्ण भूमिका 

नगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहकार उडाला आहे. सर्वच रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरलेले आहेत. कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्‍सिजनची गरज आहे. अहमदनगर इंडस्ट्रियल गॅसेस प्रा.लि.चे संचालक रमेश लोढा व विलास लोढा हे दिवस-रात्र ऑक्‍सिजन वितरीत करून रुग्णांचे प्राण वाचवित आहेत, असे गौरवोद्‌गार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेचे जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनी केले. 

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटनेच्यावतीने लोढा बंधूंचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोसिम शेख, सामाजिक कार्यकर्ते साहिल सय्यद उपस्थित होते. 

लोढा म्हणाले की, सध्या कोरोनामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना आवश्‍यक असणारा ऑक्‍सिजन महत्वाचा घटक ठरत आहे. या ऑक्‍सिजन रिफीलिंग आपल्या कंपनीत होत आहे. त्या माध्यमातून रुग्णांची प्राण वाचत आहेत. ही सेवा करण्याची आपणास इश्‍वराने दिलेले एक संधी आहे. या माध्यमातून पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. ऑक्‍सिजन सिलेंडरची जास्तीत-जास्त निर्मिती करून रुग्णांना जीवनदान देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे ते म्हणाले. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख