परप्रांतीय कामगारांनी घेतली लाॅकडाऊनची धास्ती, पुन्हा मागील वर्षीच्या आठवणी - Overseas workers fear a lockdown, reminiscent of last year | Politics Marathi News - Sarkarnama

परप्रांतीय कामगारांनी घेतली लाॅकडाऊनची धास्ती, पुन्हा मागील वर्षीच्या आठवणी

मार्तंड बुचुडे
सोमवार, 5 एप्रिल 2021

मागील वर्षाचा मार्च, एप्रिल महिना आठवताच अंगावर शहारे येतात. लॉकडाऊनच्या भितीने परप्रांतीय मजूरही परत गावी जाण्याच्या तयारीत असून, काहींनी गावाकडे पळ काढला आहे.

पारनेर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन होणार, या काळजीने परप्रांतीय मजुरांसह छोटेमोठे व्यावसायिक, हातावर पोट असणारे कामगार मजूर, टपरी चालक, हॉटेल व्यावसायिक, फळे व भाजीपाला विक्रेत्यांसह सर्वांनीच मोठी धास्ती घेतली आहे.

मागील वर्षाचा मार्च, एप्रिल महिना आठवताच अंगावर शहारे येतात. लॉकडाऊनच्या भितीने परप्रांतीय मजूरही परत गावी जाण्याच्या तयारीत असून, काहींनी गावाकडे पळ काढला आहे. 

गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य व देशातही लॉकडाऊन करण्यात आले. खेडोपाडी तसेच विविध औद्योगिक वसाहत व शहरात राहून पोट भरणारे मजूर आणि नौकरदार आपापल्या गावी व राज्यात परतले आहेत. मात्र, परतत असताना त्यांना जाण्यासाठी वाहनांची सोय नाही.

खान्यासाठी पैसा नाही. अशा अवस्थेत अतिशय हालअपेष्ठा सहन करीत अनेकांनी घरे गाठली. तसेच काही आणखी जाण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील लाखो परप्रांतिय कामगार व मजूर तसेच मुंबई, पुण्यात असलेले नौकरदार व व्यावसायीक आणि मजूरही आपआपल्या गावी गेले आहेत. मात्र, जाताना त्यांचे अतोनात हाल झाले आहेत. 

राज्य व जिह्यात कोरोनाच्या वाढत्या बातम्या येताच व लॉकडाऊनची चर्चा सुरू झाल्यानंतर लगेचच अनेक कामगार व परप्रांतय मजूर घाबरून गेले आहेत. तसेच व्यावसायिकही घाबरले आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे, ते तर चिंतेत आहेत. 
व्यावसाय तसेच हॉटेल व्यावसाय सुद्धा लगेचच थंडावले आहेत. महामार्गावरील वर्दळही कमी होत आहे. त्यातच रात्रीच्या संचारबंदीमुळेही अनेक व्यासायांवर परिणाम झाला आहे. 

हॉटेल व्यावसायिक गेली वर्षभर तोट्यातच आहेत, त्यात पुन्हा लॉडाऊनमुळे आता त्यांची चिंता वाढली आहे. बहुतेक हॉटेल बांधकाम, फर्निचर आदी व्यावसायातील कामगारही बाहेरच्याच राज्यातील अधिक आहेत. या कामगारांनी तर पळ काढण्यास सुरूवात केली आहे.

शेतक-यांचा गत वर्षी उन्हाळी भाजीपाला तसेच फळे मातीमोल किंमतींना लॉकडाऊमुळे विकावी लागली. त्यातच यंदाही तीच अवस्था होणार का, या चिंतेने शेतकरीही आता पुर्णपणे खचला आहे. शेतीमालाला बाजार नाही त्यातच पुन्ह जर लॉकडाऊन झाले तर काय, या चिंतेत शेतकरी वर्ग आहे. 

गतवर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यावर अनेकांना हजारो किलोमिटर पायपिट करून हालअपेष्टा सहन करत अपले घर गाठावे लागले. त्यावेळी झालेले हाल विचारात घेता परप्रांतीय अनेक मजूर अध्यापही त्या धक्‍यातून सावरले नसल्याने ते पुन्हा माघारी आलेच नाहीत. थोडेफार जे आले आहेत, ते सुद्धा लॉकाडाऊनच्या चर्चेने पुरते गांगारून गेले आहेत. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख