जीवन प्राधिकरणाच्या सचिवांना आमदार राजळे यांनी दिले हे आदेश

जायकवाडी जलाशयापासून उद्‍भव तयार करून तेथून भगवानगड व परिसरातील गावांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी तातडीने योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम सुरू करावे, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
Monika rajale.jpg
Monika rajale.jpg

पाथर्डी : भगवानगड व परिसरातील ४७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसह शहरटाकळी, बोधेगाव व पाथर्डी योजनांची रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सदस्य सचिव जयंत निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून केली.

नगर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयात या पाणीयोजनांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी आमदार राजळे यांनी निंबाळकर यांच्याशी चर्चा केली. कार्यकारी अभियंता व्ही. डी. वाईकर, सहायक अधीक्षक अभियंता ए. ए. मुळे, उपविभागीय अभियंता एस. एस. दहिफळे, आर. जे. चौधरी, आर. एस. आंबेटकर, व्ही. एस. वांढेकर उपस्थित होते.

या वेळी भगवानगड परिसर व ४७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, हातगाव व २८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणे, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नव्याने सर्वेक्षण व अंदाजपत्रके तयार करणे, अमरापूर, माळीबाभूळगाव व इतर ४९ गावांच्या योजनांचे सर्वेक्षण व अंदाजपत्रके तयार करणे, शहरटाकळी व २४ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, बोधेगाव व इतर सात गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसंदर्भात आढावा घेण्यात आला.

जायकवाडी जलाशयापासून उद्‍भव तयार करून तेथून भगवानगड व परिसरातील गावांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी तातडीने योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम सुरू करावे, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

निधी देण्याचे आश्‍वासन

जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव जयंत निंबाळकर यांनी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील पिण्याच्या पाणीयोजनांच्या कामांना गती देऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com