युवक काॅंग्रेसची एक कोटी स्वाक्षरी मोहीम सुरू, सत्यजीत तांबे यांचा पुढाकार - One crore signature campaign of Youth Congress started, initiative of Satyajit Tambe | Politics Marathi News - Sarkarnama

युवक काॅंग्रेसची एक कोटी स्वाक्षरी मोहीम सुरू, सत्यजीत तांबे यांचा पुढाकार

आनंद गायकवाड
मंगळवार, 13 जुलै 2021

केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना भाजपची मंडळी सातत्याने मर्यादित किमती व किरकोळ दरवाढीविरोधात आंदोलन करत होती. आता कच्च्या तेलांच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत कमी असतानासुद्धा सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात भरमसाट वाढ केली आहे.

संगमनेर : इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस (Congress) पक्ष आक्रमक झाला असून, याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आंदोलनास सुरवात झाली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने ११ ते १५ जुलैदरम्यान एक कोटी स्वाक्षरी मोहीम राबवून राष्ट्रपतींचे लक्ष वेधले जाणार आहे. संगमनेरातील शेतकी सहकारी पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलनाची सुरवात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्त करण्यात आली. (One crore signature campaign of Youth Congress started, initiative of Satyajit Tambe)

थोरात म्हणाले, ‘‘केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना भाजपची मंडळी सातत्याने मर्यादित किमती व किरकोळ दरवाढीविरोधात आंदोलन करत होती. आता कच्च्या तेलांच्या किमती आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत कमी असतानासुद्धा सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात भरमसाट वाढ केली आहे. त्यावेळी आंदोलन करणारे आता शब्दही बोलायला तयार नाहीत. या सर्व भाववाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून, संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे.’’ काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी वेळोवेळी सरकारला सूचना केल्या आहेत; मात्र एकाधिकारशाही असलेले हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

सत्यजित तांबे म्हणाले, ‘‘पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीतून ३५ ते ४० टक्के कर लावून केंद्र सरकार सर्वसामान्यांची लूट करीत आहे. त्याऐवजी १८ टक्के जीएसटी लागू करून, त्यातील ९ टक्के रक्कम राज्य व ९ टक्के केंद्र सरकारला मिळावी, असे सरळ धोरण असतानाही आडमुठेपणा करीत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला झळ देऊन भांडवलदारांना मोठे करण्याचे काम भारतीय जनता पक्ष करीत आहे. याविरोधात असंतोष खदखदत असून, येत्या आठवड्यात प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे.’’

आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, सोमेश्वर दिवटे, गौरव डोंगरे, शेखर सोसे, सचिन खेमनर, भागवत कानवडे यांसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व विविध पदाधिकारी उपस्थित होते.

 

हेही वाचा..

भाजपमध्ये काय घडतेय

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख