आता नागरिकांची सटकली ! खासदार लोखंडेवर शाई फेकण्याचा प्रयत्न - Now the citizens have escaped! MP tries to throw ink on iron | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

आता नागरिकांची सटकली ! खासदार लोखंडेवर शाई फेकण्याचा प्रयत्न

सुनिल गर्जे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

बैठकित चर्चा सुरू होण्याच्या दरम्यानच वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखधान बैठकित आले व त्यांनी खासदार लोखंडे यांच्यावर आरोप केले.

नेवासे ः कोविड बैठकिसाठी आलेल्या शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर बैठकितच एकाने शाई फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधीकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिल्याने हा प्रकार हाणून पाडण्यात आला.

नेवासे तालुक्‍यातील कोरोना नियंत्रणाबाबत आज दुपारी पंचायत समितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रशासकीय अधिकारी, पोलिस, राजकीय नेते आदींच्या उपस्थितीत सुरू असेली ही बैठकीस शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे या वेळी प्रमुख उपस्थितीत होते.

बैठकित चर्चा सुरू होण्याच्या दरम्यानच वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखधान बैठकित आले व त्यांनी खासदार लोखंडे यांच्यावर आरोप केले. तालुक्यात आॅक्सिजन नाही, कोरोना रुग्णांचे हाल सुरू आहेत. खासदार म्हणून त्यांनी काय केले, असे सवाल उपस्थित केले. सुखधान यांनी खासदारांवर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिस अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे तो फसला.

बैठकिस लोखंडे यांच्यासह सभापती रावसाहेब कांगुणे, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तालुका आरोग्यधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मोहसिन बागवान, गटविकास अधिकारी शेखर शेलार, सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कर्पे, शिंगणापूरचे पोलीस निरीक्षक सचिन बागुल आदी उपस्थित होते. 

दरम्यान, बैठक सुरू असताना खासदार लोखंडे यांच्या एका वक्तव्यावरून गोंधळ उडाला. नंतर त्यांनी सावरासारव केली व दिलगिरीही व्यक्त केली. 

 

 

राजकारण आणू नये

सुखदान यांची भूमिका राजकीय हेतूने प्रेरित होती. त्यांनी स्टंटबाजी न करता बैठकीत सविस्तर चर्चा करणे योग्य ठरले असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही राजकारण आणू नये, असे मत खासदार लोखंडे यांनी या वेळी व्यक्त केले.

 

हेही वाचा...

"लोकसेवा विकास'चे सोमवारी आंदोलन 

श्रीरामपूर : नगरपरिषदेने शहरातील नागरिकांसाठी कोविड तपासणी व लसीकरण केंद्र सुरू न केल्यास माजी आमदार भानुदास मुरकुटे लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने सोमवारी (ता. 19) मुख्याधिकाऱ्यांना घेराओ घालण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनावर माजी नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, नाना पाटील, संकेत संचेती यांच्या सह्या आहे. दरम्यान, नगरपालिकेतर्फे शहरात कोविड सेंटर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. त्यासाठी योग्य जागा शोधत असून, शनिवारपर्यंत हा प्रश्‍न मार्गी लावणार असल्याचे आश्‍वासन प्रांताधिकारी अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिल्याची माहिती मंजुश्री मुरकुटे व पाटील यांनी दिली. 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख