"रेमडेसिव्हिर'बाबत राजकारण नको, भाजप कार्यकर्ते डॉ. विखेंच्या पाठिशी : कर्डिले - No politics on 'RemediSvir', BJP activists support Dr Vikhen: MLA Kardile | Politics Marathi News - Sarkarnama

"रेमडेसिव्हिर'बाबत राजकारण नको, भाजप कार्यकर्ते डॉ. विखेंच्या पाठिशी : कर्डिले

मुरलीधर कराळे
बुधवार, 28 एप्रिल 2021

"रेमडेसिव्हिर'बाबत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर विरोधकांकडून बेताल आरोप होत आहेत. त्याबाबत न्यायालय योग्य तो निर्णय देईल; परंतु कोरोनाच्या कठिण काळात विरोधकांनी राजकारण करू नये.

नगर : "रेमडेसिव्हिर'बाबत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर विरोधकांकडून बेताल आरोप होत आहेत. त्याबाबत न्यायालय योग्य तो निर्णय देईल; परंतु कोरोनाच्या कठिण काळात विरोधकांनी राजकारण करू नये. आम्ही भाजपचे सर्व कार्यकर्ते डॉ. विखेंच्या पाठिशी आहोत, अशी भूमिका भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी मांडली. 

नगर जिल्ह्यात बेकायदा रेमडेसिव्हीर आणल्याचे कारण देऊन सध्या खासदार विखे पाटील यांच्यावर विरोधकांकडून आरोप होत आहे. याबाबत कर्डिले यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने "सकाळ'शी बोलताना भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सध्या माणसे जगविणे महत्त्वाचे आहे. रोज जवळची माणसे सोडून जाताना प्रत्येक कुटुंब हळहळले आहे. रेमडेसिव्हीर, ऑक्‍सिजनसाठी, कोरोना बेडसाठी रोज कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. प्रत्येकाचे मन विषन्न झाले आहे. अशा परिस्थितीत राजकीय कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी शक्‍य होईल तेवढी मदत करून लोकांना आधार द्यावा.

या महामारीच्या काळात कोणत्याही परिस्थितीत राजकारण करू नये. डॉ. विखेंनी रेमडेसिव्हिर कुठून आणले, कसे आणले यापेक्षा ते काहीतरी प्रयत्न करीत आहेत, हे महत्त्वाचे आहे. याबाबत योग्य ते न्यायलय ठरविल; परंतु इतर पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर आरोप करू नये. आम्ही विखे पाटील यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा कर्डिले यांनी विरोधकांना दिला आहे. 

हेही वाचा..

घरोघरी तपासणी अभियान

संगमनेर : तालुक्यातील कोवीडचा प्रादुर्भाव व संसर्ग थांबवण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार पदाधिकारी कार्यरत झाले आहेत.

प्रशासनाच्या सहकार्याने कोविड बाधित रुग्णांच्या शोध व विलगीकरणासाठी तालुक्यातील घरोघरी तपासणी अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

ते म्हणाले, संगमनेर शहरात नगरसेवक व त्या विभागात नेमून दिलेल्या शासकीय कर्मचार्‍यांनी तर तालुक्याच्या ग्रामीण भागात स्थानिक पदाधिकारी व शासकिय कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही तपासणी करायची आहे. कोरोना रुग्ण व काही लक्षणे असलेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागात 988 पथके कार्यरत केली आहेत. या पथकात शासनाच्या सर्व विभागाचे कर्मचारी, स्थानिक शिक्षकांचा समावेश आहे. ताप किंवा इतर लक्षणे आढळलेल्या संशयिताला तातडीने वेगळे करून उपचार करण्यासाठी संस्थात्मक विलिगीकरणात पाठवीत आहेत. नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळीत अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे तसेच काही लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा असे आवाहन तहसीलजार अमोल निकम यांनी केले आहे.
 

Edited B y - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख