त्या रस्त्याचे श्रेय रोहित पवारांसह खासदार विखेंनाही ! आमदार पवारांनी केले स्पष्टीकरण

तालुक्यातून जाणाऱ्या नगर-करमाळा राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. यात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार रोहित पवार धावले आहेत.
त्या रस्त्याचे श्रेय रोहित पवारांसह खासदार विखेंनाही ! आमदार पवारांनी केले स्पष्टीकरण
sujay vikhe and rohit pawar.jpg

कर्जत : ‘‘ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून नगर-करमाळा मार्गाचे काम होत आहे. त्यासाठी आपण व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा केला. विकासासाठी दर्जेदार रस्ते होणे गरजेचे आहे. भूसंपादनात कोणावरही अन्याय होणार नाही,’’ असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले. या त्यांच्या वक्तव्याने या रस्त्यासाठी भाजपचे खासदार डाॅ. विखे पाटील यांनीही प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. (MP Vikhenna along with Rohit Pawar is also responsible for that road! MLA Pawar's explanation)

तालुक्यातून जाणाऱ्या नगर-करमाळा राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. यात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार रोहित पवार धावले आहेत.

संबंधित अधिकाऱ्यांसमवेत थेट गावागावांत जाऊन, शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून घेत सर्वमान्य तोडगा काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. कैलास शेवाळे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ काळदाते, परमवीर पांडुळे, श्यामभाऊ कानगुडे, नितीन खेतमाळस, मनोज खेडकर, रामदास चौघुले, सावन शेटे, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, भूसंपादन अधिकारी ज्योती अवताडे, उपअभियंता अमित निमकर, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, गटविकास अधिकारी रूपचंद जगताप आदी उपस्थित होते.

हेही वाचा..

आमदार पवार यांनी मांदळी, थेरगाव, नागमठाण, घुमरी, कोकणगाव, मिरजगाव, बाभूळगाव खालसा, नागलवाडी, माही, जळगाव, पाटेगाव, पाटेवाडी, निमगाव डाकू व चापडगाव या गावांत बाधित शेतकऱ्यांची बैठक घेतली. शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर विविध समस्या मांडल्या. त्यावर आमदार पवार व प्रांताधिकारी नष्टे यांनी उचित कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले.
अडचणी असल्यास फेरसर्वेक्षण

भूसंपादनाबाबत रस्त्याच्या दुतर्फा, तसेच बाह्यवळण रस्त्याच्या दराबाबत तफावत, तसेच मालमत्ता व इतर नोंदी नसल्याबाबत अनेकांनी आक्षेप नोंदविले. मात्र, जेथे अडचणी असतील, तेथे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. त्यावर कार्यवाही करण्याचे प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in