मंत्री प्राजक्त तनपुरेंवर टिकेची झोड उठवून खासदार विखेंनी फुंकले रणशिंग

कारखान्याच्या मागील पंचवार्षिकमध्ये डॉ. विखे यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला. कारखान्यात शंभर कोटी रुपये घालू, उर्जितावस्था आणू, ऊस उत्पादक व कामगारांची थकीत देणी अदा करु, असा विश्वास दिला.
Tanpure and vikhe.jpg
Tanpure and vikhe.jpg

राहुरी : तनपुरे साखर कारखान्याची आगामी निवडणुक विखेंची राजकीय दिशा ठरविणारी आहे. त्यामुळे, कारखान्याचे सत्ताकेंद्र ताब्यात ठेवण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी फासे टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी शनिवारी कारखान्यात सत्तांतर घडविण्याची क्षमता असलेले राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर टीकास्त्र सोडून, रणशिंग फुंकले. (MP Vikhen blew the trumpet, criticizing Minister Prajakta Tanpur)

कारखान्याच्या मागील पंचवार्षिकमध्ये डॉ. विखे यांनी आश्वासनांचा पाऊस पाडला. कारखान्यात शंभर कोटी रुपये घालू, उर्जितावस्था आणू, ऊस उत्पादक व कामगारांची थकीत देणी अदा करु, असा विश्वास दिला. कारखान्यात सत्तांतर घडविले. परिवर्तन मंडळाचा झेंडा रोवला. तीन वर्ष बंद पडलेला कारखाना सुरु करुन लोकसभेचा मार्ग प्रशस्त केला. भाजपची उमेदवारी घेऊन, राहुरी तालुक्यातून सर्वाधिक सत्तर हजारांच्या मताधिक्क्याने बाजी मारली.

लोकसभेचे मताधिक्य डोक्यात ठेवून भाजपाचे तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांनी विधानसभा निवडणुकीत एक लाख मताधिक्क्याने विजयाचा दावा ठोकला. परंतु, मतदारांनी गणित उलटविले. राष्ट्रवादीचे युवा नेते प्राजक्त तनपुरे यांनी २७ हजारांच्या मताधिक्क्याने दणदणीत विजय मिळविला. राज्यात मंत्रिपद मिळाल्याने तनपुरेंची ताकद वाढली. त्यांनी, विकास कामांच्या माध्यमातून जनतेशी नाळ घट्ट केली. परिणामी, ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ८० टक्के गावांवर वर्चस्व मिळवून, मंत्री तनपुरे यांनी परिवर्तनाची लाट आणली.

हेही वाचा..

मागील २५ वर्षांपासून कारखान्यात होणारे वारंवार सत्तांतर मागील निवडणुकीतील आश्वासनांची अपूर्ती, बेभरोशाचा मतदार, थकीत वेतनासाठी कामगारांचा आंदोलनाचा इशारा, अशा चक्रव्यूहात खासदार डॉ. विखे यांची नौका दोलायमान स्थितीत आहे. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांना मानणारा कारखान्याचा मोठा सभासद वर्ग आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यमंत्री तनपुरे यांनी मागील निवडणुकीप्रमाणे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाचे आव्हान उभे केले. तर, मतदार पुन्हा सत्तांतर घडवतील, अशी अनामिक भीती खासदार डॉ. विखे यांच्यासमोर आहे.

हेही वाचा..

जिल्ह्याची सूत्रे हलविण्यासाठी तनपुरे कारखान्याचे सत्ताकेंद्र राखणे गरजेचे आहे. अन्यथा, भविष्यातील राजकारणाची दिशा बदलावी लागेल. याची जाणीव असल्याने, खासदार डॉ. विखेंनी एकमेव प्रतिस्पर्धी मंत्री तनपुरेंवर टिकेची झोड उठवून, रणशिंग फुंकले आहे. त्यावर, मंत्री तनपुरे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हेही विशेष..!

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com