खासदार डाॅ. विखेंची दिल्ली मोहीम छुपके-छुपके, रेमडेसिव्हीरचा मोठा साठा नगरमध्ये

सोशल मीडियावर त्यांनी आज एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ता. 19 रोजी त्यांनी दिल्लीला गुपचूप वारी केली. तेथील एका कंपनीतून रेमडेसिव्हीर इंजेक्शन घेऊन खासगी विमानाने ते आले.
sujay vikhe.jpg
sujay vikhe.jpg

नगर : जिल्ह्यात रेमडेसिव्हीरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असताना भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी याबाबत मोठा खुलासा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. त्यांनी खासगी विमानाने दिल्लीवारी केली असून, तेथून हे इंजेक्शन नगरमध्ये आणले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर त्यांनी आज एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ता. 19 रोजी त्यांनी दिल्लीला गुपचूप वारी केली. तेथील एका कंपनीतून रेमडेसिव्हीर इंजेक्शन घेऊन खासगी विमानाने ते आले. विमानातूनच त्या वेळी त्यांनी एक व्हिडिओ तयार करून ठेवला होता. आज तो अपलोड केल आहे.

सोशल मीडियावर टाकललेल्या व्हिडिओमध्ये विखे पाटील म्हणतात, माझ्या परीने जमेल ती मदत मी नगर जिल्ह्यासाठी करण्याचा प्रयत्न करीत आहे. तरुण मुले तडफडून मरताना पाहत आहे. ते मला पाहवत नाही. मला ज्यांनी खासदार केले, निवडून दिले, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने प्रयत्न करीत आहे. यामध्ये पैसा कमावण्याचा कोणाचाच उद्देश नाही. लोकप्रतिनीधी म्हणऊन हे करणे आमची जबाबदारी आहे. याबाबत मला समाधान आहे, की मी हे इंजेक्शन आणू शकलो.

माझ्या मनात पाप नाही. मी तेथील फॅक्टरीत गेलो. तेथे माझ्या मैत्री-संबंधाचा वापर केला. मदत घेतली आणि ही औषधे घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही, हे माहित नाही. खासगी विमानाने ही औषधे आणली आहेत. माझ्या मनात पाप नाही. त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही, असेही डाॅ. विखे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यात रोज तीन हजारांच्या वर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यांना रेमडेसिव्हीर मिळत नाही. अनेकांना हे इंजेक्शन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच आॅक्सिजनचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

सरकारी यंत्रणेकडून विशेष प्रतिसाद मिळत नाही. एकमेकांकडे बोट दाखवून अधिकारी नामानिराळे झाले आहेत. इंजेक्शनच उपलब्ध होत नसल्याचे सांगून टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. राजकारणीही हतबल होऊन आपण काहीच करू शकत नाहीत, माणसांंना जगवू शकत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अशाही परिस्थितीत डाॅ. विखे पाटील यांनी इंजेक्शन आणून जिल्ह्यातील काही लोकांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. 

या व्हिडिओबाबत महाराष्ट्रात उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com