कुटुंबावर शोककळा ! तीन जणांचा कोरोनाने मृत्यू, तिघांची झुंज सुरू अन चोरांकडूनही डल्ला - Mourning the family! Three people were killed by the corona, three of them started fighting and were also beaten by the thieves | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

कुटुंबावर शोककळा ! तीन जणांचा कोरोनाने मृत्यू, तिघांची झुंज सुरू अन चोरांकडूनही डल्ला

वसंत सानप
गुरुवार, 13 मे 2021

कोरोना महामारीचे संकट जाधव कुटुंबावर मोठा आघात करणारे ठरले असून, दोन चिमुरड्या मुली आणि दोन मुलं मोठ्या धाडसाने या परिस्थितीचा सामना करीत आहेत.

जामखेड : कोरोनाच्या(Corona) महामारीने आठवडाभरात एकाच कुटुंबातील तिघांना मृत्यूने कवटाळले, तर तिघेजण कोरोनाशी रुग्णालयात झुंज देत आहेत. अशातच चोरांनी घरावर डल्ला मारला, ही करुण कहाणी आहे जामखेड शहरातील जाधव कुटुंबाची. (Mourning the family! Three people were killed by the corona, three of them started fighting and were also beaten by the thieves)

आख्या जाधव कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग झाला आणि सगळेच ऐकापाठोपाठ रुग्णालयात दाखल झाले. ते पुन्हा ऐकमेकाला न भेटण्यासाठी. या आजारात तिघांचा मृत्यू झाला, तर तिघांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे समजते.

जामखेड येथील जिल्हा परिषदेत बांधकाम विभागातील सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी लक्ष्मण जाधव (वय 65), पत्नी लक्ष्मी जाधव (वय 60) व मुलगा श्रीकांत जाधव या तिघांचा आठवड्यात एकापाठोपाठ कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. आणि जाधव कुटुंबा वर दुःखाचा डोंगर कोसळला.

सर्वप्रथम लक्ष्मण जाधव यांची प्राणज्योत मालवली. दोन दिवसानंतर मुलगा श्रीकांत जाधव यालाही मृत्यूने कवटाळले. पती व मुलगा यांच्या निधनाच्या धक्क्यातून लक्ष्मीबाई ही सावरल्या नाहीत. त्यांनाही मृत्यूने बोलवणं धाडलं. श्रीकांतची पत्नी रेखा शेवगाव येथे कोरोना संसर्गावर उपचार घेत आहे.

धाकटा मुलगा प्रशांत व त्याची पत्नी संगमनेर येते उपचारार्थ दाखल आहे. जाधव कुटुंबातील तिघांचा कोरोनाच्या संसर्गा दरम्यान मृत्यू झाला, तर तिघे जण कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हेही वाचा..

कोरोना कमी होतोय

कोरोना महामारीचे संकट जाधव कुटुंबावर मोठा आघात करणारे ठरले असून, दोन चिमुरड्या मुली आणि दोन मुलं मोठ्या धाडसाने या परिस्थितीचा सामना करीत आहेत. मात्र त्यांना या दुःखातून सावरण्याचा मार्ग काही सापडत नाही .

आजोबा -आजी आणि वडिलांचे छत्र डोक्यावरून हरपले. आई आणि चुलते रुग्णालयात कोरोनाशी संघर्ष करीत आहेत. हे डोंगराएवढे दुःख त्यांच्यापुढे मोठे आव्हान बनले आहे.

हे काही थोडे होते, त्यातच पुन्हा जाधव यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. आयुष्यभर मोठ्या कष्टातून उभी केलेली पुंजी सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. यासंदर्भात जामखेड पोलिसात गोविंद जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .

जाधव कुटुंबियांना न्याय द्यावा

"लक्ष्मण जाधव यांच्या कुटुंबातील तिघांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला, तर तिघे जण कोरोनाशी संघर्ष करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आणि दुसरीकडे जाधव यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून चोरी केली व आयुष्यभर कमावलेला सर्व ऐवज लुटून नेला. याचा तपास पोलिस विभागाने तात्काळ लावा आणि उर्वरित जाधव कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा."
- अमित जाधव, नगरसेवक जामखेड.

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख