कठड्याविना पूल पाहून आमदार विखे पाटील अवाक् अन अधिकारी फैलावर

राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हार भगवतीपूर गावास जोडलेले रस्ते, तसेच वाड्या-वस्त्यांवरील चरांची विखे पाटलांनी पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
radhakrushna vikhe 1.jpg
radhakrushna vikhe 1.jpg

कोल्हार : अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या, कोल्हार-लोणी रस्त्यावरील कठड्याविना पूल पाहून आमदार राधाकृष्ण विखे पाटील अवाक् झाले. रस्त्याचे काम चांगले झाले; मात्र पुलाची कामे का अपूर्ण आहेत, असा प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. तसेच, हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशा सूचना केल्या. (MLA Vikhe Patil was shocked to see the bridge without walls)

राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हार भगवतीपूर गावास जोडलेले रस्ते, तसेच वाड्या-वस्त्यांवरील चरांची विखे पाटलांनी पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. आर. वर्पे, संजय साबळे व के. बी. गुंजाळ उपस्थित होते. दौऱ्याच्या प्रारंभीच विखे पाटील यांनी रयत विद्यालयाजवळील साखळी पुलाची झालेली दुरवस्था पाहिली. कठडे नसल्यामुळे पुलावरून एक रुग्णवाहिका कोसळल्याने चालक जखमी होण्याची घटना अलीकडेच घडली आहे. कोल्हार-लोणी रस्ता चांगला झाल्याने वाहने वेगाने धावतात. मात्र, पुलांची कामे अपूर्ण असल्यामुळे ते धोकादायक ठरत आहेत. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित खात्याने पुलांना लोखंडी कठडे बसविण्याचे काम हाती घेतले. ते अपूर्णावस्थेतच दिसत आहे.

नगर-कोपरगाव रस्त्याजवळील नवाळे वस्ती व आजूबाजूच्या शेतजमिनींच्या, पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती विखे यांनी घेतली, तसेच प्रस्तावित पाइप मोऱ्यांचे काम रद्द करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत करावा, अशा सूचना केल्या.

हेही वाचा..

हेही वाचा..

संगमनेरमध्ये नियमभंग; शहरातील तीन दुकाने ‘सील’

संगमनेर : पुन्हा कोविड रुग्ण वाढत असल्याने काहीसे सैलावलेले प्रशासन पुन्हा अॅलर्ट झाले आहे. कोविडच्या अनुषंगाने शासनाने जारी केलेल्या नियमांचा भंग केल्याने काल सायंकाळी शहरातील मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या हॉटेलसह तीन दुकाने ‘सील’ करण्यात आली.

प्रशासनानेही नियमांच्या अधीन राहून सकाळी सात ते सायंकाळी चारदरम्यान दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. खाद्यपदार्थ विकणाऱ्यांना सायंकाळी चारनंतर फक्त पार्सल सेवेला परवानगी होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरातील दुकानदारांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवण्यास सुरवात केली.

सायंकाळी चारनंतरही शिक्षणशास्त्र महाविद्यालाजवळ सुरू असलेला भाजीपाला बाजार व पेठेतील दुकानदारांना दवंडीद्वारे तंबी देण्याची वेळ आली होती. अनेक दुकानांवर दंडात्मक कारवाई करूनही फारसा उपयोग झाला नाही. आज सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील एक स्वीट्स व तीन बत्ती चौक परिसरातील लजीज हॉटेल या दुकानांत ग्राहकांची गर्दी आढळली. नायब तहसीलदार तथा प्रभारी तहसीलदार उमाकांत कडनोर, तलाठी पोमल तोरणे, भीमराज काकड, लिपिक किरण राऊत व कोतवाल रवी थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com