बुलढाण्यातील आमदार श्वेता महाले यांनी घेतले आमदार लंकेंचे कोरोनाबाबत मार्गदर्शन - MLA Shweta Mahale from Buldhana took guidance from MLA Lanka on Corona | Politics Marathi News - Sarkarnama

बुलढाण्यातील आमदार श्वेता महाले यांनी घेतले आमदार लंकेंचे कोरोनाबाबत मार्गदर्शन

मार्तंड बुचुडे
शनिवार, 22 मे 2021

आमदार लंके आमचे विधानसभेतील एक चांगले सहकारी आहेत. मी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आले.

पारनेर : "वैद्यकीय क्षेत्रातील कोणताही अनुभव नसताना कोरोना (Corona) संकटात राज्यात कोरोनाचे आदर्श काम आमदार नीलेश लंके यांनी केले. त्यांनी राज्यात कोविड सेंटरचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. येथे रुग्णांवर केवळ उपचारच केले जात नाहीत, तर मानसिक आधार देण्याचेही मोठे काम केले जाते,'' असे प्रतिपादन आमदार श्वेता महाले (Sweta Mahale) यांनी केले. (बुलढाण्यातील आमदार श्वेता महाले यांनी घेतले आमदार लंकेंचे कोरोनाबाबत मार्गदर्शन MLA Shweta Mahale from Buldhana took guidance from MLA Lanka on Corona)

बुलडाणा येथील भारतीय जनता पक्षाच्या चिखलीच्या आमदार महाले यांनी भाळवणीतील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. ""आमदार लंके आमचे विधानसभेतील एक चांगले सहकारी आहेत. मी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आले,'' असे त्या म्हणाल्या. 

""लंके कोरोनाबाधित रुग्णांना जी सेवा देतात, ते कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. माझ्या मतदारसंघात मी लंके यांच्याशी चर्चा करून कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात अशी अनेक कोविड सेंटर उभी राहाणे गरजेचे आहे. हे काम एकट्याचे नाही. यामागे हजारो हात कार्यरत आहेत,'' असे त्या म्हणाल्या. 

सरपंच राहुल झावरे, दिनेश भागवत, जितेश सरडे, अनिल गंधाक्‍ते, अभयसिंह नांगरे, संदीप भागवत, बाळासाहेब खिलारी, शरद झावरे, बबनराव गांगड व सुनील टोपले उपस्थित होते. 

 

हेही वाचा...

महात्मा गांधीजी यांचे संगमनेरला लागलेले पाय प्रेरणादायी

संगमनेर : "राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृतीकरिता संगमनेर शहरात दिलेली भेट आणि त्यानिमित्ताने बापूजींचे संगमनेर शहराला लागलेले पाय, हा संगमनेरवासीयांसाठी अमूल्य ठेवा आहे. ही भेट प्रेरणादायी व सदैव आठवणीत राहणारी आहे,'' असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. 

महात्मा गांधीजी यांच्या संगमनेर भेटीच्या शतकपूर्तीनिमित्त, बाजारपेठेतील गांधी चौकात अभिवादन करताना ते बोलत होते. ऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेल्या या शहराला छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आदींचा पदस्पर्श झाला आहे. यातून शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण झाली. 21 मे 1921 रोजी बापूजींनी या शहरात मुक्काम केला होता. नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी महात्माजींच्या हस्तस्पर्शाने पुनीत झालेल्या मानपत्राचे प्रकट वाचन केले. या वेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे, मराठी इतिहास संशोधक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर, नितीन अभंग, गजेंद्र अभंग, किशोर पवार, प्रा. बाबा खरात, सुभाष सांगळे, गौरव डोंगरे, निखिल पापडेजा, ऋतिक राऊत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, श्रीनिवास पगडाल उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले. 

 

हेही वाचा...

खतांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा

 

Edited Bt - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख