आमदार संग्राम जगताप म्हणतात, पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला

नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून, शहरात व मुख्य बाजारपेठेत, तसेच नागरी वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात घरफोड्या, भुरट्या चोऱ्या, वाहनचोऱ्या, तसेच वर्दळीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरीसारख्या घटना घडत आहेत.
sangram jagtap.jpg
sangram jagtap.jpg

नगर ः शहर व उपनगरांत चोऱ्या, घरफोड्या, सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिस प्रशासनाचा गुन्हेगारांवरील जरब संपला आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 


नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असून, शहरात व मुख्य बाजारपेठेत, तसेच नागरी वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात घरफोड्या, भुरट्या चोऱ्या, वाहनचोऱ्या, तसेच वर्दळीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरीसारख्या घटना घडत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हे करणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याने पोलिस प्रशासनाविषयी नाराजीची भावना आहे. या घटनांबाबत आपण वेळोवेळी संपर्क करून, तसेच पत्राद्वारे पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आणले होते. तरीदेखील अद्यापपर्यंत पोलिस प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही झाली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अशा घटना वाढत आहेत. गुन्हेगारांवर पोलिस प्रशासनाचा जरब राहिला नसल्याचे दिसून येत आहे, असे जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा...

पोलिसांच्या ताब्यातील आरोपीवर हल्ला

भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी एका गुन्ह्यातील पसार आरोपीला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्याकडे जात असताना, त्याच्यावर सुमारे पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला. असे पोलिसांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना रविवारी (ता. १५) रात्री घडली. यात सादिक लाडलेसाहब बिराजदार (वय ३२, रा. राजकोट चाळ, मुकुंदनगर) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सादिकची पत्नी रुक्सार सादिक बिराजदार (वय ३२, रा. राजकोट, चाळ, मुकुंदनगर) यांनी सोमवारी (ता. १६) पहाटे दोन वाजून ४९ मिनिटांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात पोलिसांनीच आरोपीला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. नगरमधील या घटनेची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. 

हेही वाचा...

वाहनचोरी झालीय नित्याचीच

शहरात वाहन, मोबाईल यांच्या चोऱ्या नित्याची बाब झाली आहे. या बाबत शहरातील तीनही पोलिस ठाण्यात दररोज फिर्यादी दाखल होत आहेत. मात्र पोलिसांना मोबाईल व वाहन चोरी करणाऱ्या टोळ्यांच्या कारवाया थांबविण्यात यश आलेले नाही. 

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com