Rohit Pawar.jpg
Rohit Pawar.jpg

आमदार रोहित पवार `झिंगाट`वर थिरकले अन कोविड सेंटरमधील वातावरण हलकं-फुलकं झालं

आमदारपवार हे कोरोना काळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. आपल्या कर्जत- जामखेड मतदारसंघात ते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत.

कर्जत : तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेले गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) देखील रुग्णांसोबत या कार्यक्रमात सहभागी होत सैराट चित्रपटातील गाण्याच्या तालावर थिरकल्याचे पाहायला मिळाले. (MLA Rohit Pawar on 'Zingaat', the atmosphere in the Covid Center became lighter.)

आमदार पवार हे कोरोना काळात कोरोनाबाधित रुग्णांसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. आपल्या कर्जत- जामखेड मतदारसंघात ते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे देखील रुग्णांचे मनोरंजन होऊन निराशा दूर होत मनोबल वाढावे, यासाठी स्थानिक गायक तुषार घोडके याचा मोफत गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

आमदार रोहित पवार व कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हीड केअर सेंटरला आमदार पवार यांनी सोमवारी भेट दिली. अचानक संध्याकाळी येऊन आमदारांनी भेट दिल्यामुळे तसेच आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यामुळे सर्व रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता.

या वेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे, तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी श्री पवार हे रुग्णांच्या चेहऱ्यावरील निराशा दूर करण्यासाठी रुग्णांसोबत सहभागी होत झिंगाट गाण्यावर थिरकले.

या वेळी लहान मुलांसह वयोवृध्दांनीही  त्याच्यासोबत नृत्य करीत आनंद लुटला. दिवस आणि रात्र एकाच ठिकाणी असल्यामुळे काहीसे निराशेत व काहीसे चिंतेत असलेल्या रुग्णांच्या चेह-यावर आनंद तर पहायला मिळालंच, मात्र त्यासोबतच संपूर्ण कोव्हीड सेंटरमध्ये एक उत्साहाचे वातावरण तयार झाले. या वेळी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी आमदार पवार यांचे आभार मानले.

या वेळी त्यांनी कोव्हिडं सेंटर मधील व्यवस्था पाहून समाधान व्यक्त केले, तसेच प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले.

कर्जत-जामखेड हे माझं कुटुंब

कर्जत- जामखेड मतदारसंघ हे माझे कुटुंब असून, त्यातील सर्व कुटुंबातील सदस्य आहेत. कोविडसेंटर मधील बधितांच्या मनोबल वाढीसाठी त्यांच्या आनंदात मी सहभागी झालो. शक्य ते सगळं करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतो. लोकांत जाऊन त्यांच्या अडचणी सोडवणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, ही आपली संस्कृती आहे.

-रोहित पवार, आमदार, कर्जत जामखेड
 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com