"कोविडमुळे निराधार झालेल्या महिलांना आमदार रोहित पवारांनी असा दिला आधार

कर्जत तालुक्यातीलही निराधार महिलांना आमदार रोहित पवारांनी शिवण यंत्र व पीठ गिरणी यंत्र देऊन असाच आधार दिला आहे.
Rohit pawar1.jpg
Rohit pawar1.jpg

जामखेड : 'कोरोनाच्या संकटात आपण घरातील कर्ता माणुस गमावला आहे. हे दुःख सर्वांसाठीच खूप मोठे मात्र या दुःखातून सावरुन मुलांचे शिक्षण, त्यांचे भवितव्य, घरातील मंडळींचे आजारपण आदी बाबी सांभाळताना मोठ्या जबाबदाऱ्याही सांभाळायच्या याकरिता लोकप्रतिनी म्हणुन असलेली जबाबदारी पार पाडताना थोडासा हातभार लागावा म्हणुन स्वयंरोजगारासाठी ही छोटीशी मदत आमदार रोहित पवारांनी केली आणि आपली पालकत्वाची भूमिका निभावली, त्यांची ही मदत निराधार झालेल्या हाताला आधार देणारी ठरली.

जामखेड तालुक्यातील नान्नज येथे कोरोनामुळे निराधार झालेल्या महिलांसाठी आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील निराधार महिलांना आधार देण्यासाठी २१ शिवण यंत्र व ३३ पिठ गिरणी यंत्र देण्यात आले.

कर्जत तालुक्यातीलही निराधार महिलांना आमदार रोहित पवारांनी शिवण यंत्र व पीठ गिरणी यंत्र देऊन असाच आधार दिला आहे.

कोरोना महामारीने अनेक कुटूंबातील कर्त्या पुरुषांवर काळाने घाला घातला. त्यामुळे अनेक जबाबदऱ्यांचे ओझे महिलांच्या खांद्यावर येऊन पडले. या कुटुंबांना आधार देण्यासाठी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी पुढाकार घेतला.पहिल्यांदा या सर्व कुटुंबियांची प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांना धीर दिला.

कोणत्याही परिस्थितीत न खचता, न डगमगता आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांना मार्गदर्शन केले.ज्या कुटुंबावर हे संकट आले त्या कुटुंबांना आपली उपजीविका भागवता यावी म्हणुन आमदार रोहित पवारांना या महिलांना आधार देण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचना केल्या.मातेचा आदेश सिरसंधारण माणून आमदार रोहित पवारांनी केलेला हा प्रयत्न निराधार कुटुंबांचे अश्रू पुसणारा ठरला आहे. नव्हे नव्हे जीवन जगण्याचा मार्ग दाखविणारा ठरला आहे. असा उपक्रम राबविणारे राज्यातील पहिले लोकप्रतिनिधी आमदार रोहित पवार ठरले आहेत.

'आधार' कार्यक्रमासाठी जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,गट विकासाधिकारी परशुराम कोकणी,तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com