आमदार नीलेश लंकेंचे 1000 बेडचे कोविड सेंटर, मिळणार मोफत सर्व सुविधा

रुग्णांसाठी योग, करमणूक, तसेच प्रवचन- कीर्तनाची सोय केली आहे. या केंद्रावर लसीकरणाचीही व्यवस्था होईल. आमदार लंके स्वत: लस घेऊन या उपक्रमाचा प्रारंभ करतील.
Nilesh lanke.jpg
Nilesh lanke.jpg

पारनेर : "राष्ट्रवादी कॉंग्रेस व आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे भाळवणीत साध्या नऊशे व ऑक्‍सिजन सुविधायुक्त शंभर, अशा एक हजार बेडची सुविधा असलेल्या कोविड सेंटरचे उद्‌घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी बुधवारी (ता. 14) होत आहे. येथे रुग्णांना मोफत औषधे, सकस आहार, तसेच करमणुकीच्या साधनांचीही सोय करण्यात आली आहे,'' अशी माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. 

भाळवणीतील डॉ. संतोष भुजबळ व प्रा. बबनराव भुजबळ यांच्या नागेश्वर मंगल कार्यालयात हे सेंटर सुरू होत आहे. येथे रुग्णांवर मोफत औषधोपचार केले जातील, तसेच त्यांना मोफत सकस आहारही देण्यात येईल.

रुग्णांसाठी योग, करमणूक, तसेच प्रवचन- कीर्तनाची सोय केली आहे. या केंद्रावर लसीकरणाचीही व्यवस्था होईल. आमदार लंके स्वत: लस घेऊन या उपक्रमाचा प्रारंभ करतील.

या केंद्राच्या उद्‌घाटनापूर्वी नियोजनाची बैठक काल झाली. आमदार नीलेश लंके, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, बाबा तरटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, कारभारी पोटघन, विजय औटी, बाळासाहेब खिलारी, सोमनाथ वरखडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा..

पारनेर तालुक्‍यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय

पारनेर : पारनेर तालुक्‍यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. परवा 137 कोरोना रुग्ण आढळून आले. रुग्णवाढीचा वेग असाच राहिला, तर तालुक्‍यात रुग्णांना बेड मिळणे कठीण होणार आहे. 

तालुक्‍यात पारनेर ग्रामीण रुग्णालयात कोरोना उपचार केंद्र आहे. पिंपळगाव रोठे येथे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच सुपे व कर्जलेहर्या येथे खसगी कोविड उपचार केंद्र आहेत. सध्या तालुक्‍यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता भविष्यात अणखी कोरोना सेंटरची गरज भासणार आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात असलेल्या रुग्ण संख्येपेक्षा या वर्षी तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक दिसत आहे. मृत्युदर देखील अधिक आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. 
तालुक्‍यात आतापर्यंत कोरोनाने 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच वर्षभरात चार हजार रुग्ण आढळून आले आहेत. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कन्टोन्मेंट झोन तयार करणे, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या टेस्ट करणे, यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 131 गावांत कोरोना ग्रामसमित्यांची स्थापना केली आहे. समितीवर गावातील संशयीतांचा शोध घेऊन त्यांच्या टेस्ट करूण घेण्याची जबाबदारी आहे. समितीत सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, प्राथमिक व माध्यामिक शिक्षक, अंगणवाडी सेवकांचा समावेश आहे.

Edited By- Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com