कोरोनाशी माझी दोस्ती झालीय, मीही डाॅक्टर झालोय ! आमदार लंकेंचे शब्द ऐकून जयंत पाटील अवाक - MLA Lanka says to Minister Jayant Patil, I have become friends with corona, I have also become a doctor | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाशी माझी दोस्ती झालीय, मीही डाॅक्टर झालोय ! आमदार लंकेंचे शब्द ऐकून जयंत पाटील अवाक

मार्तंड बुचुडे
सोमवार, 24 मे 2021

यावर लंके यांनी बोलताना सांगितले, कोरोनाशी माझी दोस्ती झालीय. मीही आता डाॅक्टर झालोय. कोरोनावरील औषधोपचार मला पाट झाले.

पारनेर : समाजाच्या संकटकाळात जो धाऊन जातो, तोच खरा समाजसेवक असतो. अशा समाजसेवकाची भूमिका आमदार निलेश लंके तंतोतंत निभावत आहेत. लंके यांचे हे काम राज्यात आदर्श व इतरांना प्रेरणादायी असून, त्यांनी तालुक्याचे नाव राज्यात रोशन केले असल्याचे गौरउदगार जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी काढले. यावर लंके यांनी बोलताना सांगितले, कोरोनाशी माझी दोस्ती झालीय. मीही आता डाॅक्टर झालोय. कोरोनावरील औषधोपचार मला पाट झाले. (MLA Lanka says to Minister Jayant Patil, I have become friends with Corona, I have also become a doctor)

आमदार लंके यांनी भाळवणी येथील नागेश्‍वर मंगल कार्यालयात सुरू असलेल्या एक हजार शंभर बेडच्या कोविड सेंटरला जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांच्या समावेत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, अॅड. राहुल झावरे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी किशोर माने, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप आदी उपस्थित होते.

राज्यात ज्या ज्या वेळी  संकट आली, त्या संकटात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नेहमी धाऊन गेले असल्याचा इतिहास आहे. त्याचप्रमाणे लंके हे सुद्धा समाजाच्या संकटात धाऊन  जाण्याचे काम करत आहेत. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासाठी पारनेर प्रसिद्ध आहे. आता लंके यांनीही समाज सेवेच व्रत अंगाकारले आहे.

पाटील पुढे म्हणाले, लंके यांच्या या कोविड सेंटरविषयी मंदिराविषयी मी फक्त  ऐकत होतो. आता येथे येऊन भेट दिल्यानंतर ते खरोखर किती रूग्ण सेवा करत आहेत, याची जाणीव झाली. त्यांच्या या कार्याचा मला, माझ्या पक्षाला अभिमान आहे. त्यांनी गेल्या १४ एप्रिलपासून सुरू केलेल्या या कामाचा लोक प्रतिनिधी म्हणून एक नवा आदर्श त्यांनी राज्यात उभा केला आहे. त्यांचे या कामामुळे ते राज्यात प्रसिद्ध झाले आहेत.

चांगले सामाजिक काम करणारी व्यक्ती असेल, तर असे काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठिशी समाज उभा राहातो. भाळवणी कोविड सेंटरसाठी जनतेतून येणाऱ्या वस्तुरूप तसेच रोख रकमेच्या मदतीवरून दिसून येत आहे.

कोरोना ओसरू लागला आहे. तो लवकरच संपुष्टात येईल, अशी आशा व्यक्त करतानाच आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. या लाटेत लहान मुलांना बाधा होणार आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकार सुसज्ज होत आहे. या सेंटरसाठी या वेळी २५ लाखांची औषधे भेट देण्यात आली.

कोरोनाची व माझी दोस्ती

या वेळी लंके म्हणाले, या कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत  ३७० रूग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शन, एक हजार २० रूग्णांना ऑक्सिजनची सुविधा दिली गेली. गेली वर्षाभरापासून रूग्ण सेवा करत असल्याने मी  देखील डॉक्टर आता झालोय. रूग्णास काय औषधोपचार करावा लागेल, याचा मलाही चांगला अनुभव आलाय. कोरोनाची व माझी दोस्ती झालीय.

 

हेही वाचा..

खतांच्या किमतीबाबतचा निर्णय योग्य

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख