आमदार लंकेंनी शब्द पूर्ण केला, बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना दिले 25 लाख - MLA Lanka fulfilled his word, gave Rs 25 lakh to the unopposed Gram Panchayats | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार लंकेंनी शब्द पूर्ण केला, बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना दिले 25 लाख

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, त्या वेळी आमदार लंके यांनी नागरीकांना बिनविरोध निवडणुका करण्याचे आवाहन करूण बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीस 25 लाखांचा निधी देण्याचे अश्‍वासनही दिले होते.

पारनेर : तालुक्यात गतवर्षी मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. ग्रामपंचायत बिनविरोध केली, तर गावाच्या विकास कामांसाठी 25 लाख रूपये देण्यात येतील, असे अश्वासन आमदार निलेश लंके यांनी दिले होते. त्या अश्वासनाची पुर्तता करत लंके यांनी त्या गावांना सभामंडप, रस्ते ,सांस्कृतीक भवन, सुशोभिकरण आदी कामांसाठी 25 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या, त्या वेळी आमदार लंके यांनी नागरीकांना बिनविरोध निवडणुका करण्याचे आवाहन करूण बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीस 25 लाखांचा निधी देण्याचे अश्‍वासनही दिले होते. या आवाहानास राज्यभर प्रसिद्धी मिळाली. मात्र त्या वेळी विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह तालुक्यातील विरोधकांनीही शंका उपस्थित करीत इतका मोठा निधी कोठून देणार, अशी टीका केली होती. 

लंके यांच्या अवाहनास प्रतिसाद देत हंगे, शिरापूर, रांधे, कारेगांव, वेसदरे, पिंप्रीपठार, जाधववाडी, भोयरेगांगर्डा व पळसपूर यासह नगर तालुक्यातील आकोळनेर ग्रामपंचायतीही बिनविरोध झाली होती. लंके समर्थकांच्या म्हणाण्यानुसार अनेक गावात केवळ विरोधकांनी खोडा घातल्याने एका जागेसाठी निवडणुका झाल्या.
बिनविरोध निवडणुका झालेल्या गावांना 25 लाखाचा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आला आहे.

मंजूर निधी पुढीलप्रमाणे (कंसातील आकडे मंजूर रक्कम) : पाबळ तळेवाडी ते पांढरकरवस्ती रस्ता (15 लाख) , जवळा ते गाडीलगांव रस्ता (25 लाख ) पळसपूर येथे स्मशानभुमी सुशोभिकरण ( 25 लाख ), शिरापूर येथे उचाळे वस्ती शिरापूर रस्ता (25 लाख), हंगे येथे सामाजिक सभागृह (50 लाख ), भोयरे गांगर्डा येथे गजाबाई मुक्ताबाई मंदीर सुशोभिकरण ( 25 लाख ), कारेगांव चारंगेश्‍वर मंदीर सभागृह (15 लाख ) व मुक्ताबाई मंदिर सुशोभिकरण (10 लाख), पिंप्रीपठार भैरवनाथ मंदिर सभामंडप ( 25 लाख), वेसदरे सांस्कृतीक भवन (25 लाख) , जाधववाडी स्मशानभुमी व प्रवेश द्वार (25 लाख ), रांधे सभामंडप व मज्जीद सुशोभिकरण (25 लाख), देवसवडे येथे टेकडवाडी ते काळेवाडी घाट ( 25 लाख ), राळेगणथेरपाळ येथे डोमेवस्ती ते खंडोबावस्ती रस्ता (15 लाख ), कडूस येथे वाघाजाई मंदीर सभामंडप (पाच लाख ) नांदूरपठार येथे श्रीकृष्ण मंदीर सुशोभिकरण (पाच लाख ) बाबुर्डी बेंद (ता. नगर गावठाण ते शिवरस्ता (25 लाख ), पिंप्रीघुमट ते हंडेवस्ती रस्ता (20 लाख ) , आकोळनेर गावांतर्गत काँक्रीटीकरण (10 लाख ), देउळगांवसिद्धी सांस्कृतीक सभागृह ( 50 लाख) , बाबुर्डी घुमट रस्ता (20 लाख ), हिंगणगांव कुरणमळा रस्ता (25 लाख). 

दरम्यान, याची चर्चा महाराष्ट्रभर झाली होती.

मी शब्द पाळणारा आमदार 

मी दिलेला शब्द पाळणारा आहे, केवळ वाचाळविर नाही. ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करा, तुमच्या गावाला 25 लाखांचा निधी देतो, असे आवाहन मी केले होते. काही गावांनी प्रतिसादही दिला, मात्र काही गावात राजकीय हेतूने खोडा घातला गेला. ज्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या त्यांना निधी देउन मी वचनपूर्ती केली, असे मत आमदार नीलेश लंके यांनी व्यक्त केले.

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख