आमदार कानडे आयत्या पिठावर रेघा मारतात : माजी आमदार कांबळे यांची टीका

आमदार लहू कानडे खोटे उद्घाटन करीत आहे. आम्ही विरोधक असल्याने आमच्या कामाला प्रसिद्धी मिळु नये. म्हणून आमचा नामोल्लेख टाळने ठिक आहे.
Lahu kanade.jpg
Lahu kanade.jpg

श्रीरामपूर : तालुक्याचे आमदार लहू कानडे (Lahu Kanade) सध्या विविध ठिकाणी उद्घाटनाची कामे करीत आहे. आणि हे रस्ते आपण स्वतः कसे मंजूर करुन आणले, याचा खोटा प्रचार करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केला आहे. (MLA Kanade draws lines on flour: Criticism of former MLA Kamble)

आपल्या कार्यकाळात सन २०१८- २०१९ मध्ये साडेनऊ कोटी रुपयांच्या निधीचे विविध रस्ते आपण मंजूर करुन आणले होते. हे सर्व रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेमार्फत मंजुर झाले आहे. मात्र विद्यमान आमदार लहू कानडे खोटे उद्घाटन करीत आहे. आम्ही विरोधक असल्याने आमच्या कामाला प्रसिद्धी मिळु नये. म्हणून आमचा नामोल्लेख टाळने ठिक आहे. परंतू ज्या मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून हे काम स्वतः करीत आहे. त्यांचे नाव व फोटो देखील टाकण्यास आमदार कानडे यांना कमीपणा वाटतो. ज्यांनी मदत केली. त्यांचे नाव घ्यायला तुम्हाला कमीपणा वाटत असेल, तर तुम्ही लोकप्रतिनिधी कसे होऊ शकतात. असा आरोप माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील अनेक मंदिरांसमोर सध्या पेविंग ब्लॉक बसवण्यात येत आहे. त्यासाठी लागणारा निधी देखील आपल्या, कारकिर्दीत मंजूर करून आणलेला आहे. त्याचे उद्घाटन करताना आमदार कानडे यांना मित्रपक्षाची नावे घ्यायला कमीपणा वाटतो. त्यामुळे जनतेने सध्याचे उद्घाटनाची कामे पाहुन दिशाभूल करून घेवु नये. आम्ही आमच्या मागील कार्यकाळात कामे मंजूर करून आणली आहे. आणि सध्याचे विद्यमान आमदार लहु कानडे केवळ आयत्या पिठावर रेघा मारीत असल्याची टीका माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी केली आहे.

हेही वाचा..

थोरातांनी केले हिंद सेवा मंडळाचे कौतुक

नगर : पेमराज सारडा महाविद्यालयात होत असलेले बदल व गुवात्तेत होत असलेली वाढ कौतुकास्पद आहे. आमदार लहू कानडे यांच्या सारखे अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालाने उच्चपदस्थ केले आहे. गरीब व गरजू विद्यार्थांसाठी शिक्षणाची व्यवस्था करण्याचे महत्वपूर्ण कार्य हिंद सेवा मंडळ करत आहे. अशा संस्थेचे प्रश्न शासन दरबारी सोडवण्यासाठी निश्चीतच सर्व सहकार्य करू, असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पेमराज सारडा महाविद्यालयास भेट दिली. या वेळी हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी सत्कार केला. या वेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अजित बोरा, माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, संचालक सुमतिलाल कोठारी, प्रा. मकरंद खेर, सुजित बेडेकर, डॉ. पारस कोठारी, रणजीत श्रीगोड, अनंत देसाई, प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, उपप्राचार्य डॉ. मंगला भोसले, प्रबंधक अशोक असेरी, बी. यु. कुलकर्णी, सचिन मुळे आदींसह प्राध्यापक उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्रभर या महाविद्यालयातील विद्यार्थी चांगल्या पदावर असल्याचे कौतुक मान्यवरांनी केले.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com