आमदार काळे - माजी आमदार कोल्हेंमध्ये रंगले श्रेयवादावरून नाट्य

आपल्याच पाठपुराव्यामुळे श्रेणीवर्धनास मंजुरी मिळाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे श्रेयवादावरून दोघे पुन्हा आमने-सामने आले आहेत.
Ashutosh kalen and snehalata kolhe.jpg
Ashutosh kalen and snehalata kolhe.jpg

कोपरगाव : शहरातील मध्यवस्तीत सहा एकर क्षेत्रात विस्तारलेले कोपरगाव ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णलयात रूपांतरित करण्यासाठी मान्यता मिळाली. दरम्यान, भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) व विद्यमान आमदार आशुतोष काळे (Asutosh Kale) या दोघांनी, आपल्याच पाठपुराव्यामुळे श्रेणीवर्धनास मंजुरी मिळाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे श्रेयवादावरून दोघे पुन्हा आमने-सामने आले आहेत. (MLA Kale - A play on the credentials of former MLA Kolha)

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की तीस खाटांचे अद्ययावत इमारतीसह रुग्णालय, कर्मचारी निवासस्थान बांधकाम पूर्ण आहे. या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालय करण्यात यावे, यासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. सन २०१८ च्या हिवाळी अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित करून लक्ष वेधले होते. सन २०११च्या जनगणनेवर आधारित आरोग्य संस्थांचा जोड बृहत् आराखडा तयार करण्याचे काम आरोग्य सेवा संचालनालय स्तरावर सुरू असून, ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कळविण्यात आले होते. त्यानुसार प्रस्तावास मान्यता मिळाली आहे.

दरम्यान, आमदार आशुतोष काळे यांनीदेखील, आपल्या पाठपुराव्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी पत्रकात म्हटले आहे, की विधानसभा निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यात सुसज्ज रुग्णालय उभारण्याचे वचन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, यादृष्टीने प्रयत्न होते. कोरोनाच्या संकटात नागरिकांनी, १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे, असा आग्रह धरला होता. आपण पाठपुरावा केल्याने १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळाली आहे. केवळ दीडच वर्षात जाहीरनाम्यातील वचनांची पूर्तता होत असल्याचे आत्मिक समाधान मिळत असून, उर्वरित वचनांची पूर्तता करण्यासाठी यापुढेही बांधील असल्याचे आमदार काळे म्हणाले.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com