आमदार डाॅ. किरण लहामटेंच्या घरावर या कारणासाठी काळे झेंडे - MLA Dr. Black flags for this purpose at Kiran Lahamate's house | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

आमदार डाॅ. किरण लहामटेंच्या घरावर या कारणासाठी काळे झेंडे

शांताराम काळे
मंगळवार, 22 जून 2021

आदिवासींच्या समस्या सोडवण्यास राज्यातील आमदार, खासदार अपयशी ठरले असल्याने त्यांच्या विरोधात नाराजी आहे.

अकोले : आपण आदिवासींच्या आरक्षित जागेवर निवडून आला आहात. तुम्ही जर आदिवासींचे प्रश्‍न सोडविणार नसाल, तर तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकर नाही. प्रश्‍नाला सामोरे जाण्याऐवजी आम्हाला टाळून तुम्ही मुंबईला निघून जाता. त्याचे उत्तर तुम्हाला आदिवासी समाज आगामी निवडणुकीत नक्क देईल, असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे देत आमदार डॉ. किरण लहामटे (Kiran Lahamte) यांच्या घरावर काळे झेंडा बांधून त्यांच्या पत्नी पुष्पा लहामटे यांना निवेदन देण्यात आले. (MLA Dr. Black flags for this purpose at Kiran Lahamate's house)

आदिवासींच्या समस्या सोडवण्यास राज्यातील आमदार, खासदार अपयशी ठरले असल्याने त्यांच्या विरोधात नाराजी आहे. राज्यातील पहिले आंदोलन तालुक्यातील राजूर येथे करण्यात आले. उद्यापासून प्रत्येक आदिवासी आमदारांच्या दारावर मोर्चा जाणार असल्याचे परिषदेचे लकी जाधव यांनी सांगितले.

ते म्हणाले, की आदिवासींच्या समस्या सुटत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळेच सर्वप्रथम आदिवासींच्या आरक्षित जागांवर व त्या प्रमाणपत्रावर निवडून आलेल्यांनी जबाबदारी सांभाळून त्यांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करून तत्काळ बोगस आदिवासींनी बळकावलेल्या जागी खऱ्या आदिवासींची विशेष नोकरपद भरती करावी. पदोन्नती आरक्षण विरोधी आदेश तत्काळ मागे घेऊन पूर्ववत करण्यात यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच हे प्रश्‍न न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. एकनाथ भोये, नीरज चव्हाण, संदीप गवारी, रामू ईदे, मनीष गाबळे, रुक्मिणी ठाकरे, बाळा पडवी, राजेंद्र घारे, वाळू पुंदे, केशव रोंगटे, लक्ष्मण तळपे, संदीप गवारी, नीरज चव्हाण उपस्थित होते. 

हेही वाचा..

जनतेकडे दुर्लक्ष करणे चुकीचा पायंडा ः घुले

पाथर्डी ः कोरोना काळात जनतेकडे दुर्लक्ष करणे, हा चुकीचा पायंडा येथील काही लोकांकडून पाडला जात आहे. मित्रधन परिवाराने वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करुन लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचे केलेले कार्य चांगले आहे, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी दिला.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात घुले बोलत होते. शिवशंकर राजळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, बंडू बोरुडे, दिगंबर गाडे, डॉ. योगीराज देशमुख, नासीर शेख, बन्सीभाऊ आठरे, बाबा राजगुरू, स्वप्नील देशमुख, रवींद्र आरोळे, पप्पू बोर्डे, सीताराम बोरुडे, योगेश रासणे उपस्थित होते.

घुले म्हणाले, ‘‘मित्रधन परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली आहे. रक्तदान करुन कोरोनाच्या काळात अनेकांचे जीव वाचावेत म्हणून काम केले आहे. वृक्षलागवडीची चळवळ जोमाने सुरू ठेवा. राष्ट्रवादी पक्षाने कोविड काळात रुग्णांना आधार देण्याचे काम केले.’’

 

हेही वाचा..

माझी झोप उडालीय, मंत्र्यांना झोपू देणार नाही

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख