`त्या` प्रकाराबाबत आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी माफी मागावी - MLA Dr. about that type. Kiran Lahamate should apologize | Politics Marathi News - Sarkarnama

`त्या` प्रकाराबाबत आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी माफी मागावी

शांताराम काळे
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्यासमोरच झालेल्या या प्रकारामुळे या प्रकाराचा बोलविता धनी तेच आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागावी.

अकोले : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कोरोना आढावा बैठकीत राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या रवी मालुंजकर यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला. पक्षाने संबंधितावर कारवाई करावी. तसेच आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्यासमोरच झालेल्या या प्रकारामुळे या प्रकाराचा बोलविता धनी तेच आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागावी. अन्यथा काॅंग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीसोबत काम करणार नाहीत, असा इशारा काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचाैरे यांनी दिला.

अकोले येथील शासकीय विश्रामगृहात अयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते मधुकर नवले, मिनानाथ पांडे, बाळासाहेब नाईकवाडी, रमेशराव जगताप, चंद्रभान निरगुडे, शंकरराव वाळुंज, अरीफभाई तांबोळी, शिवाजी नेहे, संपतराव कानवडे, मंदाबाई नवले, विक्रम नवले, रामदास धुमाळ, साईनाथ नवले, उबेद शेख आदी उपस्थित होते.

तालुकाध्यक्ष मालुंजकर यांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला व दंडेली करून कामकाजात अडथळा आणला. विशेष म्हणजे तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासमोर त्यांचा कार्यकर्ता असे कृत्य करतो, याचा बोलविता धनी आमदार लहामटे हेच आहेत, असा आरोप वाकचाैरे यांनी केला.

हे महाआघाडीच्या तत्वाला व व्यवहाराला घातक कृत्य त्यांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षचा राजीनामा घेऊन संबंधितांवर राष्ट्रवादी काँग्रेसने कारवाई करावी. तसेच त्यांनी त्यांनी माफी मागावी, अन्यथा काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्याबरोबर कोणत्याच पातळीवर काम करणार नाही, असा इशारा वाकचौरे यांनी दिला.

मधुकरराव नवले म्हणाले की, मंत्री थोरात यांच्या बैठकीत जाणून बुजून गोंधळ घालून मिटिंग हाणून पाडण्याचा डाव होता. कोरोनाच्या गंभीर परिस्थिती आमदारांनी पालकमंत्री, आरोग्य मंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाणे गरजेचे असताना शुल्लक आंदोलनात गुंतून ठेवून भोळ्या आमदारांचा फायदा कोण घेते, याचा विचार खुद्द आमदारांनी करावा. रेमडेसिव्हीर वितरण व्यवस्थित केले नाही, म्हणून राज्याचे अन्न व प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांना जबाबदार धरून त्यांना पदावरून हटविले, मग याला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात जबाबदार कसे? असा सवाल करीत थोरात यांनी अकोले संगमनेर तालुक्यात कधीही दुजाभाव केला नाही.

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख