मंत्री, अभिनेत्यांप्रमाणे सर्वसामान्य कोरोना रुग्णांचीही नावे जाहीर करावीत : आमदार पाचपुते यांची मागणी - Ministers, like actors, should announce the names of common corona patients | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

मंत्री, अभिनेत्यांप्रमाणे सर्वसामान्य कोरोना रुग्णांचीही नावे जाहीर करावीत : आमदार पाचपुते यांची मागणी

संजय आ. काटे
रविवार, 18 एप्रिल 2021

कोरोनाला रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्य करत आहे. अनेक रुग्ण बिनधास्तपणे घराबाहेर सुपर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत.

श्रीगोंदे : राज्यात कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह बिनधास्तपणे फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी व इतर नागरिक बाधित होणार नाहीत, याची काळजी घेण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांची नावे जाहीर करण्यात यावीत, अशी मागणी आमदार बबनराव पाचपुते यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देवून केले. 

पाचपुते यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाला रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्य करत आहे. अनेक रुग्ण बिनधास्तपणे घराबाहेर सुपर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत. मंत्री, आमदार, खासदार, उद्योगपती, अभिनेते स्वतःची नावे जाहीर करून संपर्कात येणाऱ्यांना सुपर स्प्रेडर होण्यापासून रोखत आहेत. 

सामान्य नागरिक कोरोना पॉझिटिव्ह झाला, तर आरोग्य, महसूल, ग्रामपंचायत, नगरपालिकांनी त्यांची नावे प्रसारित करावीत. जेणेकरून हे रुग्ण इतरांना बाधित करणार नाहीत. कोरोनाला काही प्रमाणात रोखता येवू शकते, असे पाचपुते यांनी निवेदनात म्हटले आहे. 

 

हेही वाचा...

थोरात कारखान्यातर्फे कोविड सेंटरचे काम सुरू 

संगमनेर : शहरासह तालुक्‍यातील वाढती रुग्णसंख्या पाहता, सर्व खासगी हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयासह शासकिय कोविड सेंटरमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून जाणाऱ्या कोल्हार घोटी राज्यमार्गावरील विघ्नहर्ता पॅलेस येथे 500 बेडचे कोविड सेंटर उभारण्यास युध्दपातळीवर सुरवात झाली. 

महसूलमंत्री म्हणून राज्यपातळीवरील महत्वाची जबाबदारी पार पाडताना आठवड्यातील दोन दिवस मंत्री बाळासाहेब थोरात त्यांच्या मतदार संघातील कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतात. राज्य सरकार कोवीडची अधिक संक्रमण करणारी दुसरी लाट थोपवण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. या पार्श्वभुमिवर शहरातील आरोग्य व्यवस्थेवर शेजारच्या अकोले, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, कोपरगाव व नाशिक येथील रुग्णांचा ताण वाढला आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी व्हेंटीलेटर व ऑक्‍सिजनयुक्त बेड, रेमडेसिवीर सारखी जीवरक्षक साधने व औषधे उपलब्ध करताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत. येथील थोरात कारखान्यात पुरुषांसाठी 300 व महिलांसाठी 200 असे 500 बेडचे कोविड सेंटर युध्दपातळीवर उभारले जात आहे. 

शासकीय नियमांचे पालन करावे

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. शासनाच्या नियमांचे पालन करावे. यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळावी तसेच प्रशासनानेही कडक शिस्त लावण्याची भुमिका घेण्याची आवश्‍यकता आहे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख