शिवसंपर्क अभियानातून मंत्री गडाख कर्जत नगरपंचायतीची बांधणी करणार - Minister will build Gadakh Karjat Nagar Panchayat through Shiv Sampark Abhiyan | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसंपर्क अभियानातून मंत्री गडाख कर्जत नगरपंचायतीची बांधणी करणार

निलेश दिवटे
शनिवार, 17 जुलै 2021

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

कर्जत : शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे प्रथमच कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. ते आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना कोणता मूलमंत्र देतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. कोरोनाच्या महामारीत शांत आणि संयमी, प्रसंगी कणखर भूमिका घेत त्यांनी परिस्थिती हाताळली आणि नियंत्रणात आणली. त्यांच्या मंत्रिमंडळात गडाख यांची मंत्री म्हणून वर्णी लागली.

सध्या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून त्यांनी जिल्हा पिंजून काढला असून, त्यामुळे शिवसैनिकांत चैतन्य पसरले आहे. येथे त्यांच्या स्वागताची तयारी पदाधिकारी व शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. येथील नगरपंचायतीची निवडणूक उंबरठ्यावर असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हा महाविकास आघाडीचा प्रयोग होणार की अजून काही व्यूहरचना करणार, याबाबत उद्या पडदा उघडणार आहे.

येथील नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता आहे व पारडे जड आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपकडून खेचून येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी नगरपंचायत निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न केले असून, जय्यत तयारी सुरू केली आहे.

काँग्रेससुद्धा आपले अस्त्र पाजळीत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीबाबत मंत्री गडाख काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

हेही वाचा..

पावसाला नाही जोर

अकोले : जुलै महिना अर्धा संपला, तरीही जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोटात पावसाला जोर नसल्याने भातशेती करणाऱ्या आदिवासी बांधवांची चिंता वाढली आहे.

जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांत मुळा व प्रवरा या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यांत तुफान पाऊस बरसतो. यंदा मात्र अजूनपर्यंत धरणांमधील पाण्याची आवक रोडावलेलीच आहे.
उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या प्रवरा नदी खोऱ्यातील घाटघर व रतनवाडी ही दोन्ही ठिकाणे जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची समजली जातात. दर वर्षी जुलैच्या सुरवातीपासून या परिसरात पावसाचा अक्षरशः झंझावात सुरू असतो. त्यामुळे सह्याद्रीच्या शिखरांवरून शेकडो जलप्रपात भंडारदरा जलाशयाच्या दिशेने वाहत असल्याचे दृश्य दिसते. या कालावधीत परिसरातील निसर्गसौंदर्य बहरत असल्याने, राज्यातील विविध ठिकाणांहून हजारो पर्यटक येथे गर्दी करतात. या वर्षी मात्र जुलै महिना निम्मा सरूनही भंडारदऱ्याच्या पाणलोटात पावसाला जोर नसल्याने, या भागातील जलप्रपात दिसेनासे झाले आहेत.
 

हेही वाचा..

वेळ पडल्यास जिल्ह्यात ताकद दाखऊ

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख