सोनिया गांधींच्या कॉन्फरन्समध्ये मंत्री थोरात सहभागी, केल्या या सूचना 

खासदार राहुल गांधी यांनी मार्गदर्शन करताना, कॉंग्रेस शासित राज्यांनी कोरोना नियंत्रणाची पावले उचलताना त्याचा विपरीत परिणाम जनतेच्या उपजीविकेवर होऊ न देण्याची काळजी घेण्याची सूचना केली.
Soniya gandhi with balasaheb thorat.jpg
Soniya gandhi with balasaheb thorat.jpg

संगमनेर : कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनी आज देशातील कॉंग्रेसशासित राज्यांतील मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधला.

या वेळी राज्यातील कोरोना स्थिती व लसीकरण मोहिमेचा आढावा घेऊन, कोरोना नियंत्रण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना त्यांनी केल्या. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरातून यात सहभाग घेतला. 

खासदार राहुल गांधी यांनी मार्गदर्शन करताना, कॉंग्रेस शासित राज्यांनी कोरोना नियंत्रणाची पावले उचलताना त्याचा विपरीत परिणाम जनतेच्या उपजीविकेवर होऊ न देण्याची काळजी घेण्याची सूचना केली.

राज्याची भूमिका मांडताना महसूलमंत्री थोरात यांनी, "महाविकास आघाडी सरकार पूर्ण क्षमतेने कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहे. देशात सर्वांत जास्त चाचण्या राज्यात होत असून, लसीकरणातही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्या'चे सांगितले. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला हव्या तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केला जात नसल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसपुरवठा पुरेशा प्रमाणात करावा, न्यायभावनेने व मागणीप्रमाणे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन व इतर वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्याची मागणी त्यांनी केली. 

व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये देशभरातील काही मुख्यमंत्री, नेते सहभागी झाले होते. 

हेही वाचा...

आरोग्य केंद्राचा पाच तालुक्‍यांना आधार 

कोल्हार : कोरोना लसीकरणासाठी कोल्हार भगवतीपूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र राहाता तालुक्‍यासह श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर व कोपरगाव या पाच तालुक्‍यांसाठी आधार ठरत आहे. ग्रामीण भागातील हे आरोग्य केंद्र अव्वल असून, आजअखेर येथे चार हजारांहून अधिक नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. 

नाशिक मंडळाचे आरोग्यसेवा उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी आरोग्य केंद्रास भेट देवून माहिती घेतली. तसेच शेरेबुकात प्रशंसनीय अभिप्राय नोंदविला. लसीकरण सुरू झाल्यापासून आरोग्य केंद्रात लस घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. डॉ. संजय घोलप व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नियोजनामुळे अद्याप येथे लसींचा तुटवडा भासला नाही. आतापर्यंत येथे साडेचारशेपेक्षा जास्त व्यक्तींनी लस घेतली. 

आरोग्य केंद्रात चार विभागांप्रमाणे कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून, शासनाने दिलेल्या सूचनेनुसार सोमवारी, बुधवारी व शुक्रवारी नियमितपणे लसीकरण सुरू आहे. 
ज्येष्ठांना नोंदणीसाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी लसीकरण केंद्रावर ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था आहे, असे डॉक्‍टर घोलप यांनी सांगितले. डॉ. नीलेश पारखे, डॉ. हेमंत निर्मळ, तसेच विशाल सातपुते व प्रशांत पंडुरे हे समुदाय आरोग्य अधिकारी व पाच आरोग्यसेविका व औषधनिर्माण अधिकारी, आरोग्य कर्मचारी यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 
 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com