मंत्री तनपुरेंचा भाजपाला झटका, यांना हटविले एका योजनेच्या अध्यक्षपदावरून - Minister Tanpur's blow to BJP removes him from the post of chairman of a scheme | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मंत्री तनपुरेंचा भाजपाला झटका, यांना हटविले एका योजनेच्या अध्यक्षपदावरून

राजेंद्र सावंत
सोमवार, 28 जून 2021

मिरी-तिसगाव जिल्हा परीषदगट हा सेनेचा बालेकिल्ला समजला जायचा. शिवसेनेचे अनिल कराळे व मोहन पालवे या दोन नेत्यांच्या निधनानंतर या भागात आता कोण नेतृत्व करणार, हे आगामी जिल्हा परीषद निवडणुकी नंतरच समजेल.

पाथर्डी : मिरी-तिसगाव (Miri tisgaon) पाणी योजना समितीचे अध्यक्ष एकनाथ आटकर यांना अध्यक्षपदावरुन हटवुन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षाला चांगलाच झटका दिला. (Minister Tanpur's blow to BJP removes him from the post of chairman of a scheme)

मिरी-तिसगाव जिल्हा परीषदगट हा सेनेचा बालेकिल्ला समजला जायचा. शिवसेनेचे अनिल कराळे व मोहन पालवे या दोन नेत्यांच्या निधनानंतर या भागात आता कोण नेतृत्व करणार, हे आगामी जिल्हा परीषद निवडणुकी नंतरच समजेल.

मंत्री तनपुरे यांच्या राहुरी मतदार संघाला पाथर्डीतील हा गट जोडलेला आहे. माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचे समर्थक व पंचायत समितीचे सदस्य एकनाथ आटकर यांना अध्यक्षपदावरुन बाजुला करण्यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी कंबर कसली होती.

२५ जुन २०२० रोजी रात्री दोन वाजेपर्यंत फिरुन पाणी योजनेच्या सभासद असणाऱ्या गावातील सरपंचांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोळा करीत होते. २६ जुनला पंचायत समितीच्या सभागृहामधे बैठकीत आटकर यांना पदावरुन हटविण्याचा ठराव ३३ पैंकी २३ गावच्या संरपचांनी केला व तो मंजुरही झाला.

मंत्री, तनपुरे यांनी यासाठी चार तास वेळ दिला. भारतीय जनता पक्षाचे गोकुळ दौंड, बाळासाहेब अकोलकर, पुरुषोत्तम आठरे, राहुल गवळी या पदाधिकाऱ्यांसमोर आटकर यांना हटविण्याचा ठराव झाला.

राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाला चांगलीच चपराक दिली. समितीच्या कामकाजावर सरपंच मंडळी नाराज असल्याचे कारण पुढे केले असले तरी राष्ट्रवादीला त्यांच्या मर्जीतील व्यक्तीची अध्यक्षपदी निवड करण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप भाजपाकडुन करण्यात आला आहे. योजना ताब्यात घेतानाच कुचकामी होती.

निकृष्ठ काम झाल्याने कोणीही अध्यक्ष झाले तरी फार काही बदल होईल असे नाही. मात्र, राष्ट्रवादीने या गटात मोर्चेबांधणी करुन संघटन मजबुत करण्यावर जोर दिला आहे. भाजपाकडुन शांत राहण्याचे धोरण स्विकारण्यात आले आहे. एकाही पदाधिकाऱ्याने विरोध नोंदविला नाही. मंत्री तनपुरे यांनी स्वतः ठराव मांडला व तो मंजुरही झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला चांगलाच झटका दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. आता समितीच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड होते याकडे लक्ष लागले आहे.

 

हेही वाचा..

खासदार विखे पाटील यांची गुगली

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख