जयंत पाटलांच्या मध्यस्थिने `कुकडी`च्या आवर्तनाचा तिढा सुटला, पाचपुतेंनी मांडली बाजू - With the mediation of Jayant Patil, the rotation of 'Kukadi' came to an end, Pachpute presented his side | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

जयंत पाटलांच्या मध्यस्थिने `कुकडी`च्या आवर्तनाचा तिढा सुटला, पाचपुतेंनी मांडली बाजू

संजय आ. काटे
मंगळवार, 11 मे 2021

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आपण स्वतः आमदार रोहित पवार, आमदार अतुल बेनके उपस्थित होते. या वेळी असणारी गरज, पाणी नाही मिळाले, तर शेतकऱ्यांचे कधी ही न भरून येणारे नुकसान आदींबाबी जयंत पाटील यांच्या समोर मांडल्या.

श्रीगोंदे : मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या आवर्तनाला स्थगिती दिल्याने आवर्तनाबाबत सर्वत्र संभ्रम निर्माण झाला होता. आज ( ता. ११) मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या सोबत लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक झाली. यात चर्चेतून सकारात्मक मार्ग निघाल्याने कुकडीच्या आवर्तनचा विषय मार्गी लागल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांनी दिली. (With the mediation of Jayant Patil, the rotation of 'Kukadi' came to an end, Pachpute presented his side)

पाचपुते म्हणाले, की जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आपण स्वतः आमदार रोहित पवार, आमदार अतुल बेनके उपस्थित होते. या वेळी असणारी गरज, पाणी नाही मिळाले, तर शेतकऱ्यांचे कधी ही न भरून येणारे नुकसान आदींबाबी जयंत पाटील यांच्या समोर मांडल्या. कोणत्याही परिस्थितीत पाणी सोडावेच लागेल, ही स्पष्ट भूमिका घेतली. ज्या याचिकेमुळे या विषय लांबला. त्या याचिकाकर्त्याना आमदार बेनके यांनी फोन केला. जयंत पाटील स्वतः त्यांच्याशी बोलले.

हेही वाचा...

राहुल जगतापांनी फुंकले रणसिंग

पिंपळगाव जोगे धरणासाठी २५ कोटींचा निधी वापरून डेडस्टॉक चे पाणी वापरात आणले जाईल. पाण्याचा कायमचा च प्रश्न मार्गी लागेल. हा कुकडी प्रकल्पातील सर्वांचाच मोठा फायदा आहे. आपण सहकार्याची भूमिका घ्यावी, असे याचिककर्त्यांसस अश्वसित केले. त्यामुळे न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या अनुषंगाने सकारात्मक चर्चा झाली. न्यायालयाचा निकाल ही सकारात्मक असेल, कुकडी चे आवर्तन तातडीने सुटून सर्वांना पाणी मिळेल, अशी माहिती पाचपुते यांनी दिली. 

 

डिंभे - माणिकडोह बोगद्याचा निर्णय लवकरच...

पाचपुते म्हणाले,डिंभे ते माणिकडोह बोगदा हा कुकडी प्रकल्पासाठी नवसंजीवनी ठरणार आहे. हा बोगदा झाला तर एक आवर्तना एवढे वाया जाणारे पाणी सहज उपलब्ध होऊन सर्वांनाच न्याय मिळेल. या बाबत जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात आज चर्चा झाली. अशीच एक बैठक घेऊन तो विषय सर्वांना एकत्र बसून मार्गी लागेल, त्यामुळे कुकडी चा मोठा प्रश्न सुटून पाण्या ची कमतरता कधीच जाणवणार नाही.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख