नगरच्या महापौरपदाचे बिगुल वाजले ! शिवसेना- कॉंग्रेसमध्ये मोर्चेबांधणी - The mayor's trumpet sounded! Shiv Sena- Front formation in Congress | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

नगरच्या महापौरपदाचे बिगुल वाजले ! शिवसेना- कॉंग्रेसमध्ये मोर्चेबांधणी

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 28 मे 2021

नगर महापालिकेचे महापौरपद सध्या भाजपकडे आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपला या पदावर संधी मिळाली. येत्या 30 जूनला ही मुदत संपत आहे.

नगर : नगरच्या महापौरपदाची मुदत संपत आल्याने या पदासाठी शिवसेना (Shivsena) व कॉंग्रेस (Congress) नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याबाबत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे पद आपल्यालाच मिळविण्याचा शब्द घेतला आहे, तर कॉंग्रेसच्या नेत्यांनीही महसूलमंत्र्यांच्या माध्यमातून "फिल्डिंग' लावली असल्याचे सूत्रांकडून समजते. (The mayor's trumpet sounded! Shiv Sena- Front formation in Congress)

नगर महापालिकेचे महापौरपद सध्या भाजपकडे आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपला या पदावर संधी मिळाली. येत्या 30 जूनला ही मुदत संपत आहे. नव्या निवडीसाठी महापालिकेने नाशिक विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक होईल की नाही, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. अशाही स्थितीत राजकीय वातावरण मात्र चांगलेच गरम झाले आहे. महापौरपद हे अनुसूचित जाती महिला उमेदवारासाठी राखीव आहे. 

राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीची महाआघाडी असल्याने आता या तीन पक्षांपैकी एकाच्या गळ्यात ही माळ पडणार आहे. आज शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेवून, हे पद शिवसेनेलाच मिळावे, अशी गळ घातली. मुख्यमंत्र्यांनीही या पदावर शिवसेनेलाच संधी दिली जाईल, असा शब्द दिला असल्याचा दावा या नेत्यांनी केला. शिवसेनेकडे नगरसेविका रोहिणी शेंडगे, रिता भाकरे व शांताबाई शिंदे या उमेदवार आहेत. 

नगरमध्ये कॉंग्रेसला संजीवनी देण्यासाठी हे पद कॉंग्रेसला मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते. याबाबत स्थानिक नेत्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना गळ घातली आहे. शिवाय दोन महिन्यांपूर्वी थोरात यांनी नगरमध्ये पक्षाच्या एका बैठकीत, कोणत्याही परिस्थितीत आगामी महापौरपद कॉंग्रेसलाच मिळेल, असे सांगितले होते. त्यामुळे नव्याने वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेसकडून नगरसेविका शीला चव्हाण या एकमेव उमेदवार आहेत. 

दोघांच्या भांडणात राष्ट्रवादीचा लाभ? 

महापालिकेत सध्या सर्वाधिक 23 नगरसेवक शिवसेनेकडे आहेत. राष्ट्रवादीकडे 18, भाजप 15, कॉंग्रेस 5, बसप 4, समाजवादी पक्ष 1 व अपक्ष 1 असे बलाबल आहे. मागील वेळी राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपला महापौरपद मिळाले होते. आता परिस्थिती बदलली आहे. शिवसेना व कॉंग्रेसने महापौरपदासाठी दावा केला असला, तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. या सर्व गदारोळात राष्ट्रवादी कॉंग्रेसच बाजी मारेल, अशी भीतीही शिवसेना व कॉंग्रेसमधून व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीकडे नगरसेविका रूपाली पारगे या एकमेव उमेदवार आहेत. 

हेही वाचा..

मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेण्यासाठी विखेंची तयारी

 

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख