शिवसेनेला महापौर, राष्ट्रवादीला उपमहापौर ! काॅंग्रेसला काय दिला शब्द

महापालिकेच्या निवडणुकीनंतर मागील अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या. भाजपला कमी जागा असतानाही राष्ट्रवादीच्या मदतीने महापौर व उपमहापौर ही दोन्हीही महत्त्वाची पदे भाजपला मिळाली.
nagar.jpg
nagar.jpg

नगर : महापौर व उपमहापौरपदावर नवनिर्वाचितांची अधीकृत घोषणा आज सकाळी 11 च्या दरम्यान होणार आहे. काल दोन्ही पदांसाठी एक-एक अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली. मात्र कायदेशिर सोपस्कर आज होईल. महाविकास आघाडीमुळे नगरमध्ये शिवसेनेला (Shivsena) राष्ट्रवादीने पाठबळ दिले. शिवसेनेचा महापौर, राष्ट्रवादीला उपमहापौर देण्यात आले. मात्र कमी नगरसेवक असलेल्या काॅंग्रेसला काय शब्द दिला, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. (Mayor to Shiv Sena, Deputy Mayor to NCP! What a promise to Congress)

महापालिकेच्या निवडणुकीनंतर मागील अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या. भाजपला कमी जागा असतानाही राष्ट्रवादीच्या मदतीने महापौर व उपमहापौर ही दोन्हीही महत्त्वाची पदे मिळाली. राष्ट्रवादीने कोणताही अट न ठेवता व कोणतेही पद न घेता ही महत्त्वाची पदे भाजपला दिली. केवळ शिवसेनेला सत्तेत येऊ द्यायचे नाही, हा उद्देश होता. त्यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीत धुसफूस सुरू होती.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस हे तीन प्रमुख पक्ष मित्र पक्ष झाले. केवळ भाजपला सत्तेत सहभागी होऊ द्यायचे नाही, या इर्शेतून हे तीनही पक्ष एकत्र आले. त्याचा परिणाम नगरमध्ये महापौर निवडणुकीवरही दिसून आला.

गेले अडीच वर्षे विरोधी बाकावर बसलेल्या शिवसेनेला आता संधी द्यायची, हे गणित वरिष्ठपातळीवरून ठरले. स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये एकत्र येण्याची इच्छा नसतानाही वरिष्ठांच्या आदेशामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे शिवसेेनेला महापौरपद मिळाले. तर राष्ट्रवादीला उपमहापौरपद.

या सर्व घडामोडीत महाविकास आघाडीत काॅंग्रेसच्या नगरसेवकांंना काहीच मिळाले नाही. नगरसेवकांची संख्या अत्यल्प असल्याने ही स्थिती निर्माण झाली. त्यामुळे या नगरसेवकांनी काल उमेदवारी अर्जही नेले. काॅंग्रेसच्या नगरसेवकांनी अर्ज नेल्यामुळे आघाडीत बिघाडी होते की काय, असा प्रश्न उपस्थित झाला. नंतर मात्र हे अर्ज दाखल करण्यात आले नाही. नाराज असलेल्या काॅंग्रेसच्या नगरसेवकांना नेमका आश्वासने मिळाली, हे मात्र समजू शकले नाही. काॅंग्रेसचे हे बंड थंड कसे झाले, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. यापूर्वी काॅंग्रेसला महापौरपद मिळावे, यासाठी संबंधित नेत्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे घातले होते, हे विशेष.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com