हॅकर्सची कमाल, जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांचे फेसबुक अकाउंट हॅक - Maximum of hackers, Collector Dr. Rajendra Bhosale's Facebook account hacked | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

हॅकर्सची कमाल, जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांचे फेसबुक अकाउंट हॅक

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची दोन फेसबुक अकाउंट आहेत. त्यांपैकी एक "डॉ. राजेंद्र भोसले आयएएस' या नावाने कार्यालयीन वापराकरिता, तर "राजेंद्र भोसले' या नावाने व्यक्‍तिगत वापराकरिता आहे.

नगर : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले आहे. याबाबत त्यांनी स्वतः पोस्ट टाकून याबाबतची माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची दोन फेसबुक अकाउंट आहेत. त्यांपैकी एक "डॉ. राजेंद्र भोसले आयएएस' या नावाने कार्यालयीन वापराकरिता, तर "राजेंद्र भोसले' या नावाने व्यक्‍तिगत वापराकरिता आहे. त्यांचे व्यक्‍तिगत फेसबुक अकाउंट अज्ञाताने हॅक केले आहे.

याबाबतची माहिती त्यांनी स्वतःच्या अकाउंटवर पोस्ट टाकून दिली आहे. नवीन अकाउंटवरून येणाऱ्या फ्रेंड रिक्‍वेस्ट कोणीही स्वीकारू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

 

हेही वाचा...

निर्मळ पिंपरीत 20 लाखाचा बनावट दारुसाठा जप्त 

श्रीरामपूर : राज्य उत्पादन शुल्काच्या येथील भरारी पथकाने लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सुमारे 20 लाखाची बनावट दारुसाठा आज जप्त केला. निर्मळ पिंपरी (ता. राहता) परिसरात छापा टाकून गोवा राज्यनिर्मित व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला विदेशी दारुसाठा पकडला. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. 

या प्रकरणी दीपक मच्छिद्र निर्मळ (रा. निर्मळ पिंपरी, ता. राहता), दीपक भाऊसाहेब पारधी (रा. जांबूत, ता. संगमनेर), किरण शांताराम गुंजाळ (रा. कासार दुमाला, ता. संगमनेर) व राजेंद्र सीताराम रहाणे (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) यांना अटक करुन सुमारे 20 लाख 80 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

राहता येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आज दुपारच्या सुमारास आरोपींना हजर केले. न्यायालयाने त्यांना सोमवार (ता. बारा) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

ही कारवाई प्रभारी पोलिस उपअधीक्षक संजय सराफ, पोलिस निरीक्षक अनिल पाटील, पोलिस निरीक्षक संजय कोल्हे, दुय्यम पोलिस निरीक्षक के. यु. छत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरराव अधिक तपास करीत आहे. 

विविध कंपन्यांची दारुच्या बाटल्या व बनावट बुचसह दोन आयशर टेम्पो, एका कारसह एक दुचाकी असा एकूण 20 लाख 80 हजार 445 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख