स्वस्तात सोन्याचे अमिष पुण्यातील व्यक्तीस नडले, 10 लाखांना गंडा, 20 जणांवर गुन्हे

यापूर्वीही तालुक्‍यात अशा घटना घडल्या आहेत. त्या घटनांशी या घटनेचे साधर्म्य असल्याचे बोलले जात आहे.
Gold.jpg
Gold.jpg

जामखेड : पुणे येथील एका व्यक्तीस स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने तालुक्‍यातील पाटोदा गरडाचे येथे बोलावण्यात आले. ही व्यक्ती आली असता, पंधरा ते वीस जणांच्या टोळीने तीस दहा लाख रुपयांना लुटले.

या व्यक्तीने जामखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पंधरा ते वीस जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही तालुक्‍यात अशा घटना घडल्या आहेत. त्या घटनांशी या घटनेचे साधर्म्य असल्याचे बोलले जात आहे. 

स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने हडपसर (पुणे) येथे राहणाऱ्या एका व्यक्तीस आरोपी अमोल (पूर्ण नाव माहीत नाही), परमेश्‍वर काळे, रामा (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर अज्ञात पंधरा ते वीस जणांनी आमच्याकडे सोने आहे. ते विकायचे आहे, असे म्हणून संबंधित व्यक्तीचा विश्‍वास संपादन केला. तसेच त्यास जामखेड तालुक्‍यातील पाटोदा गरडाचे या परिसरात 31 मार्च रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोलवले. या वेळी आजूबाजूला पंधरा ते वीस जण दबा धरुन बसले होते. ही व्यक्ती आली असता, दबा धरुन बसलेल्या आरोपींनी त्यास घेराव घातला. तसेच तलवारीचा धाक दाखवून 10 लाख 7 हजार रुपये रोख व 7 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, असा एकूण 10 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. 

संबंधित व्यक्तीने गुरुवारी (दि. 8) जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आले. त्यावरून पोलिसांनी पंधरा ते वीस जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत. 

हेही वाचा..

नियमांचे पालन न करणारांवर कारवाई करा

राहुरी : प्रत्येक गावात कोरोना ग्राम दक्षता समिती सक्रिय करा. त्यात तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, सरपंच, आशा सेविका यांचा समावेश असावा. कोरोना निर्बंधांचे पालन करीत नाहीत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. प्रसंगी पोलिसांची मदत घ्या. अशा सक्त सूचना तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी वीस गावांतील प्रतिनिधींच्या बैठकीत दिल्या.

आज (शुक्रवारी) मांजरी येथे कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी वीस गावांमधील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील, वैद्यकिय अधिकारी, आशा सेविका, मुख्याध्यापक यांच्या संयुक्त बैठकीत तहसीलदार शेख बोलत होते.

प्रांताधिकारी दयानंद जगताप, गट विकास अधिकारी गोविंद खामकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड उपस्थित होते.

तहसीलदार शेख म्हणाले, "पंधरा पेक्षा अधिक कोरोना बाधित आढळले. तेथे कंटेनमेंट झोन करून, परिसर सील करा. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या त्वरित रॅपिड टेस्ट करा. प्रशासनाला सहकार्य करीत नसलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करा. कोरोना ग्राम दक्षता समितीने जबाबदारीने काम करावे."

गटविकास अधिकारी खामकर म्हणाले, "शनिवार-रविवार पूर्ण बंद पाळा. विनाकारण गर्दी करू नका. मास्कचा वापर करा. कोरोना नियंत्रणात येईल." अशोक विटनोर यांनी आभार मानले.
 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com