गडाखांना नगरचे पालकमंत्री करा ! `शिवसंवाद`मध्ये कार्यकर्त्यांनी घातली गळ

उपस्थितीत सर्वच पदाधिकाऱ्यांचा ‘मंत्री शंकरराव गडाख यांना नगर जिल्ह्याचे पालकमंत्री करा,’ असा सूर होता.
Shankarrao gadakh.jpg
Shankarrao gadakh.jpg

नेवासे : राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांच्या उपस्थितीत सोनईत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा ‘शिवसंवाद’ मेळावा झाला. या वेळी उपस्थितीत सर्वच पदाधिकाऱ्यांचा ‘मंत्री शंकरराव गडाख यांना नगर जिल्ह्याचे पालकमंत्री करा,’ असा सूर होता. या मागणीचा धागा पकडत कोरेगावकर व कृषिमंत्री भुसे यांच्या भाषणातील सूचक वक्तव्यानंतर पदाधिकाऱ्यांनी ‘शिवसेना स्टाईल’ने घोषणा देत प्रतिसाद दिला. तब्बल वर्षभरानंतर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी शिवसंवाद मेळाव्यानिमित्त एकत्र आल्याने त्यांच्यात मोठे उत्साहाचे वातावरण होते. (Make Gadakh the Guardian Minister of the city! Activists put their throats in 'Shiv Samvad')

तालुक्यातील घोडेगाव उपबाजार आवारातील व्यापारी गाळ्यांचे उद्‍घाटन आज (ता. २८) भुसे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर नगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व शहरप्रमुखांच्या 'शिवसंवाद' मेळाव्याचे सोनईत आयोजन करण्यात आले होते. त्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत मंत्री गडाख यांना जिल्ह्याचे पालकमंत्री करा, अशी मागणी केली.

तोच धागा पकडत भुसे म्हणाले, ‘‘काही गोष्टी इथे बोलण्यापेक्षा आम्हाला मंत्रालय पातळीवर बोलाव्या लागणार आहेत आणि काही गोष्टी पाहिजे, तर मुख्यमंत्र्यांच्या पण कानावर घालाव्या लागणार आहेत. पालकमंत्र्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की हे महाविकास आघाडीचे सरकार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते मोठा भाऊ म्हणून काम करत आहेत. आणि त्या पद्धतीची वागणूक नगर जिल्ह्यातील शिवसेनेला सुद्धा दिली पाहिजे. हा विषय आधी त्यांच्या (राष्ट्रवादी) पक्षाच्या नेते मंडळीच्या कानावर घालू, असे सांगत गरज पडली तर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कानावर पदाधिकाऱ्यांच्या भावना घालू. निश्चितपणे आपल्या परंतु तुमच्या मनात जे काय आहे ते पण होतंय का ते पण आपण पाहू असे सूचक वक्तव्य ही त्यांनी केले.

भाऊ कोरेगावकर म्हणाले, "शिवसैनिकांच्या त्यांच्या खूप काही मागण्या नसतात. महाविकास आघाडी म्हटल्यानंतर कधी कधी तोंड दाबून बुक्क्याचा मार पण सहन करावा लागते. पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्रीबाबत केलेल्या मागणी आपण निश्चितच पक्षप्रमुखांपर्येंत नेऊ.

शंकरराव गडाख म्हणाले, " अनेक नेत्यांच्या बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेला आहे अनेक जणांचा अनुभव घेऊन मी आता इथे शिवसेनेत आलेलो आहे. पण मला तुम्हाला एकच सांगायचंय की शिवसेनेला उद्धव ठाकरेंचे नेतृत्व भेटले ते नेतृत्व मी कुठलेही पक्षामध्ये बघितले नाही. गेल्या पाचवर्षात मला एका पक्षाने प्रचंड त्रास दिला. परंतु उद्धव ठाकरेंनी मला जो आधार दिला, धीर दिला, मला मदत केली ते करत असताना अनेक घडामोडी झाल्या. मात्र मी त्याच वेळेस मनोमन ठरवलं होतं की माझ्यावरती कितीही दबाव टाकला गेला पण मी ठरवलं होतं, की उद्धव ठाकरेंना मी सोडणार नाही. त्याच्याबरोबर राहणार आणि त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला. सगळ्या अडचणी असताना मला मंत्री पदावर ती बसवलं. त्यांच्यासह शिवसैनिकांच्या अपेक्षा मी निश्चितच कामातून पूर्ण करणार आहे.

आता प्रत्येक महिन्यात 'शिवसंवाद'

शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांकडे जनतेचे असलेले विविध प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महिन्यातून एकदा शिवसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, मंत्री शंकरराव गडाख यांनी यावेळी सांगितले. दरम्यान आपणही या मेळाव्यासाठी येत जाऊ असे मंत्री भुसे यांनी जाहीर केले.

हेही वाचा..

Edited By - Murilldhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com