साईसंस्थानवर स्थानिकांनाच हवे प्राधान्य ! महाविकास आघाडीतील नेत्यांकडे साकडे

साईसंस्थानच्या प्रत्येक निर्णयाचा व बदलाचा स्थानिक बाजारपेठेवर परिणाम होतो. चार पैकी एखादे महाद्वार काही कारणामुळे बंद करावे लागल्यास त्या भागातील व्यापार थंडावतो.
saibaba.jpg
saibaba.jpg

शिर्डी : साईसंस्थानचे (Saibaba Sansthan) संभाव्य नवे मंडळ व ग्रामस्थ यांच्यात सुसंवाद असावा. नियोजित विकासकामे वेगाने पूर्ण व्हावीत. येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनव्यवस्था व अन्य सुविधा तसेच बाजारपेठेला पुरक वातावरण राहावे, यासाठी नव्या मंडळात स्थानिकांचा प्राधान्याने विचार व्हावा, अशी मागणी महाविकास आघाडीतील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. (Locals want priority on Sai Sansthan! Sakade to the leaders of Mahavikas Aghadi)

साईसंस्थानच्या प्रत्येक निर्णयाचा व बदलाचा स्थानिक बाजारपेठेवर परिणाम होतो. चार पैकी एखादे महाद्वार काही कारणामुळे बंद करावे लागल्यास त्या भागातील व्यापार थंडावतो. शिर्डी भोवतालच्या तीस ते पस्तीस गावांतील अनेकांची रोजीरोटी देवस्थानावर अवलंबून आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, संस्थान व ग्रामस्थांचा मेळ साधण्याचे काम स्थानिक विश्‍वस्त करू शकतात. तसे झाले तर महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी सुकरतेने करणे शक्य होते.

आजवर ज्या ज्या वेळी स्थानिक कार्यक्षम विश्वस्तांना संधी मिळाली, त्या त्या वेळी कटुता टाळण्यास मोठी मदत झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संस्थान व बाजारपेठेतील व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यात महत्त्वाची भूमिका आजही आहे. या पक्षाचे गौतम बॅंकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, नीलेश कोते, सुधाकर शिंदे, अमित शेळके, संदीप सोनावणे हे मंडळात संधी मिळविण्यासाठी इच्छुक आहेत.

साईसंस्थान व ग्रामस्थ यांच्यात महत्त्वाचा दुवा म्हणून भूमिका बजावणारे शिवसेनेचे नेते कमलाकर कोते व त्यांचे सहकारी संजय शिंदे व राहुल गोंदकर, विश्‍वस्तपदाचा अनुभव तसेच साईमंदिरातील दर्शनव्यवस्थेबाबत महत्त्वाचे निर्णय घेणारे डाॅ. एकनाथ गोंदकर त्यांचे सहकारी सचिन चौगुले व अन्य मंडळी काँग्रेसपक्षाकडून इच्छुक आहेत.
मात्र ज्या ज्या वेळी स्थानिकांना डावलून केवळ राजकीय सोय म्हणून विश्‍वस्तपदी वर्णी लावण्याचे प्रयत्न झाले, त्या त्या वेळी ग्रामस्थ व मंडळात संघर्षाचे प्रसंग उभे राहीले. नियुक्तीनंतर पुन्हा न फिरणारे विश्‍वस्त पहायला मिळाले. बैठकांना दांड्या मारणाऱ्यांना पद गमावण्याची वेळ आली, हा इतिहास आहे. हे टाळण्यासाठी स्थानिक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी जोर धरते आहे.

साईबाबांविषयी अस्था असणारे हवेत

आम्ही विश्‍वस्त नसलो, तरी साईसंस्थान व ग्रामस्थांचा मेळ साधून विविध अडचणी सोडविण्यासाठी वेळ देतो. साईबाबा आणि शिर्डी विषयी आस्था असणारे मंडळ असावे. त्यामुळे ज्यांच्याकडे क्षमता व झोकून काम करण्याची तयार आहे, अशा स्थानिकांना नव्या मंडळात संधी मिळायला हवी, असे मत शिवसेनेचे नेते कमलकार कोते यांनी व्यक्त केले.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com