बंडातात्यांना पंढरपुरला जाऊ द्या, अन्यथा पांडुरंगही माफ करणार नाही

पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले येथे बाजारतळाजवळकोल्हार- घोटी रस्त्यावर अगस्ती मंदिरातून वारकरी भजन गात आघाडी सरकारचा निषेध करत आंदोलन केले.
vaibhav pichad 1.jpg
vaibhav pichad 1.jpg

अकोले : राज्यातील आघाडी नाही, तर बिघाडी सरकार दारूचे दुकाने सुरू करून पवित्र मंदिरे बंद करत आहे. बंडातात्या कराडकर यांना पायी वारीला जाऊ न देता त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र बंडा तात्याने (Banda tatya) महाराष्ट्रातील वारकऱ्यांना एक आवाज दिला, तर सरकारला पळता भुई थोडी होईल, ते होऊ नये असे वाटत असेल, तर बंडा तात्यांना मोकळे करून त्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ द्या,.अन्यथा पांडुरंग देखील माफ करणार नाही, असे उद्गार भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभव पिचड यांनी काढले. (Let the rebels go to Pandharpur, otherwise Pandurang will not forgive either)

पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले येथे बाजारतळाजवळ कोल्हार- घोटी रस्त्यावर अगस्ती मंदिरातून वारकरी टाळ मृदुंगाच्या निनादात उद्धवा अजब तुझे सरकार या गाण्याचा जयघोष करत रस्त्यावर तीन तास भजन गात आघाडी सरकारचा निषेध करत आंदोलन केले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, दीपक महाराज देशमुख, भाजप गट नेते जालिंदर वाकचौरे, भाजप महिला जिल्हा अध्यक्ष सोनाली नाईकवाडी, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, युवा अध्यक्ष राहुल देशमुख उपस्थित होते. या वेळी प्रसंगी तहसीलदार कार्यालयला निवेदन देण्यात आले.

दीपक महाराज देशमुख म्हणाले, की बंडा तात्या कोण आहेत. हेच या सरकारला कळले नाही. उद्धव ठाकरे यांनी बंडा तात्यासोबत संपूर्ण शिवसेना उभी राहील, असे काही दिवसापूर्वी सांगितले होते. त्याबाबत ऑडियो क्लिप उपस्थितांना ऐकून दाखवत हे सरकार देव धर्माच्या विरोधात आहे. महाराष्ट्रीय जनता त्यांना माफ करणार नाही.

सोनाली नाईकवाडी यांनी, बंडा तात्या यांच्या माध्यमातून देशातील वारकरी रस्त्यावर येऊन सरकारला जाब विचारील, याचे भान ठेवावे, असे म्हटले.

हेही वाचा..

कोपरगावातील त्या कामांमधील भ्रष्ट्राचाराला आमचा विरोध

कोपरगाव : शहरवासीयांच्या २८ कामांना भाजप व मित्रपक्षांचा विरोध नाही, तर त्या कामात होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध आहे. बदली झाल्यानंतर नंतर ५२ कामांचे पूर्णत्वाचे दाखले देणारे व ३४ नव्या कामांना मंजुरी व एक कोटी रुपयांचे बिले काढणाऱ्या पराक्रमी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या विरोधात येत्या दोन दिवसात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे सुतोवाच नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व पराग संधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.

भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे,शहराध्यक्ष दत्ता काले नगरसेवक विजय वाजे,,रवींद्र पाठक ,जनार्दन कदम,योगेश बागुल,कैलास जाधव अतुल काले ,विजय आढाव जितेंद्र रणशूर ,दीपक गायकवाड आदींसह नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

संधान म्हणाले, की शहरातील २८ कामांपैकी केवळ सहा ते सात कामांना आमचा विरोध असून, त्यात कामांच्या अव्वाच्या सव्वा किमती दाखवल्या आहेत. आमदारांचा या निधीशी कुठलाही संबध नाही.केवळ श्रेय घेत आहेत. ज्या रस्त्यांची गरज नाही, ते कामे भ्रष्टाचारासाठी केले गेले. लोकप्रतिनिधी व नगराध्यक्ष शहरवासियांना चुकीचे संदेश देत असून इतर पाच कोटींच्या कामांना सत्ताधार्यांनी तत्काळ मंजुरी दिली त्याची उद्घाटने केवळ लोकप्रतिनिधी व नगराध्यक्षच करत आहे.
 

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com