नेत्यांनो पाणीप्रश्नी एकत्र या, अन्यथा मी एकटी लढेल : अनुराधा नागवडे

कुकडीच्या पाण्याबाबत "स्टंटबाजी' न करता नेतेमंडळींनी ठोस भूमिका घेतली पाहिजे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू असताना काही नेतेमंडळी श्रेयवाद करण्यात धन्यता मानतात.
Anuradha nagawade.jpg
Anuradha nagawade.jpg

श्रीगोंदे :  "कुकडी'च्या आवर्तनास होत असलेल्या विलंबामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी एकीकडे होरपळत आहेत, तर दुसरीकडे तालुक्‍यातील नेते राजकारण करून श्रेयाच्या लढाईत गुंतलेले आहेत. पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे. अन्यथा "कुकडी'च्या पाण्यासाठी एकटीच लढणार असल्याची घोषणा महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे यांनी केली. 

पत्रकार परिषदेत नागवडे म्हणाल्या, "कुकडीच्या पाण्याबाबत "स्टंटबाजी' न करता नेतेमंडळींनी ठोस भूमिका घेतली पाहिजे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू असताना काही नेतेमंडळी श्रेयवाद करण्यात धन्यता मानतात. कुकडीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत ठोस भूमिका घेण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी एकत्र यावे. 

नागवडेंच्या नेतृत्वाखाली लढण्यास कुणाला कमीपणा वाटत असल्यास जो कोणी पुढे येईल, त्यांच्यासोबत आम्ही राहू. कोणी सोबत आले नाही, तरी कुकडीच्या प्रश्‍नावर एकटी लढण्याचीही माझी तयारी आहे, असेही नागवडे म्हणाल्या. 

छत्रपती महाविद्यालयात जागा उपलब्ध करून देणार

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करीत आहोत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कोविड सेंटरसाठी शहरातील छत्रपती महाविद्यालयात जागा उपलब्ध करून देणार आहोत, असे महिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी सांगितले.

हेही वाचा...

वाद मिटल्यावर घेतला भाजी-भाकरीचा आस्वाद 

अकोले : तालुक्‍यातील कुंभेफळ येथील दोन शेतकऱ्यांनी निळवंडे डाव्या कालव्याचे काम बंद पाडले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांची तीन तास समजूत काढल्यानंतर हे काम पुन्हा सुरू करण्यात आले. वादावर पडदा पडून शेवट गोड झाल्याने अधिकाऱ्यांनी कार्यस्थळावर भोजनाचा आनंद घेतला. 

तालुक्‍यातील कुंभेफळ येथे नंदू रामचंद्र कोटकर व बाबासाहेब सदाशिव कोटकर या शेतकऱ्यांनी आक्षेप घेत डाव्या कालव्याचे काम बंद पाडले होते. त्यानंतर प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मुकेश कांबळे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता प्रमोद माने व महसूल मंडळ अधिकारी बाबासाहेब दातखिळे यांनी कुंभेफळ येथे धाव घेतली. 

एका शेतकऱ्याने आपल्या आठ एकरातून तीन एकर जमीन संपादित करणे अयोग्य असल्याचे सांगितले. त्यावर ही जमीन शासनाने आपणास दिली आहे. त्यापैकी पाच एकर जमीन आपणास करण्यास दिली असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचे समधान झाले. दुसऱ्या शेतकऱ्याने जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याचे सांगितले. त्यावर अधिकाऱ्यांनी मूळ मालकाने नुकसान भरपाईची रक्कम घेतली असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या शेतकऱ्याचाही विरोध मावळला. तब्बल तीन तास अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. त्यानंतर हे काम सुरू झाले. 
ऑल इज वेल झाल्यानंतर दुपारनंतर जलसंपदा विभागाचे प्रमोद माने यांनी भाजी-भाकरी उपलब्ध करून दिल्यानंतर प्रांताधिकारी, तहसीलदार, अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांची पंगत बसली. अशा पद्धतीने वादावर पडदा पडला अन्‌ शेवट गोड झाला. 

Edited By- Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com