लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे लसीचा तुटवडा, भाजप कार्यकर्त्यांची आमदार कानडे यांच्यावर टीका - Lack of vaccine due to negligence of people's representatives, BJP workers criticize MLA Kanade | Politics Marathi News - Sarkarnama

लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे लसीचा तुटवडा, भाजप कार्यकर्त्यांची आमदार कानडे यांच्यावर टीका

गाैरव साळुंके
शनिवार, 29 मे 2021

इतर तालुक्यांमध्ये जास्तीत-जास्त लस पुरवठा होत आहे. परंतू तालुक्याच्या आमदारांचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही.

श्रीरामपूर : उत्तर नगर जिल्ह्यातील इतर तालुक्यापेक्षा तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणचा टक्का सर्वात कमी आहे. कोरोनाच्या संकटात लोकप्रतिनिधी फक्त जनतेची दिशाभूल करण्याचे कार्य आहे. केवळ निवडणूकीपुरते लोकांना जवळ करायचे आणि त्यानंतर उपकार केल्यासारखे वागायचे. असा प्रकार किती दिवस चालणार अशी टीका भाजपाच्या येथील पदाधिकाऱ्यांनी आमदार लहू कानडे यांचे नाव घेता केली आहे.

कोरोनापासून बचावासाठी लसीकरण महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे देशासह राज्यात लसीकरण सुरु आहे. सरकारी यंत्रणा लसीचे सर्व जिल्ह्यात योग्य प्रकारे वाटप करीत असल्याचे वाटत होते. परंतू भाजपा युवा मोर्चाच्या काही पदाधिकार्‍यांनी याबाबत माहिती घेतल्यावर उत्तर नगर जिल्ह्यात सर्वात कमी लसीकरण हे श्रीरामपूर तालुक्यात झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तालुक्याचे लोकप्रतिनिधी काय करतात. असा सवाल भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हरकल व जिल्हा सरचिटणीस विशाल यादव यांनी केला आहे.

तालुक्यामध्ये 45 वर्षावरील लसीकरण दुसर्‍या डोससाठी जेष्ठ नागरीक त्रास सहन करुनही उन्हात उभे राहुन दुसरा डोस घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. रात्रभर जागरण करुनही लसीचा दुसरा डोस मिळत नाही. मात्र इतर तालुक्यात चांगल्या पद्धतीने जेष्ठ नागरीकांसाठी लसीची व्यवस्था केलेली आहे. 

इतर तालुक्यांमध्ये जास्तीत-जास्त लस पुरवठा होत आहे. परंतू तालुक्याच्या आमदारांचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. फक्त जनतेची दिशाभुल करण्याचे कार्य लोकप्रतिनिधी करीत असल्याचा आरोप भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हरकल व तालुका अध्यक्ष दत्ता जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. 

शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनामुळे अनेक जेष्ठ नागरिकांसह तरुणांचा मृत्यू झाला आहे. परंतू तालुक्याची हक्काची लस दुसरीकडे कशी जाते याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी तालुक्याला पुरेशी लस मिळण्यासाठी वेळीच लक्ष घालण्याची मागणी भाजपा युवा मार्चाचे जिल्हाउपाध्यक्ष रुपेश हरकल जिल्हा सरचिटणीस विशाल यादव, तालुकाध्यक्ष दत्ता जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. 

हेही वाचा...

दिलासादायक, कोरोना कमी होतोय

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख