राज्यपाल, मंत्री, आमदारांचे आवडते `कृष्णावंती` बनले कोंबड्यांचे खुराड

लाखो रुपये खर्च करून तत्कालीन कार्यकारी अभियंता मेंडिगिरी यांनी हे सुंदर विश्रामगृह बांधले. मात्र, घाटघर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले.
Krushanvanti.jpg
Krushanvanti.jpg

अकोले : राज्यपाल, मंत्री, खासदार, आमदार, राजपत्रित अधिकाऱ्यांची बडदास्त ठेवण्यासाठी एके काळी भंडारदरा (Bhandardara) येथील कृष्णावंती विश्रामगृह आवडीचे ठिकाण होते. मात्र, घाटघर प्रकल्प पूर्ण झाला आणि या विश्रामगृहाची रयाच गेली. हे विश्रामगृह कोंबड्यांच्या, उंदरा-मांजरांच्या, कुत्र्यांचे विश्रांतिस्थान बनले आहे. (Krishnavanti became the favorite of governors, ministers and MLAs)

लाखो रुपये खर्च करून तत्कालीन कार्यकारी अभियंता मेंडिगिरी यांनी हे सुंदर विश्रामगृह बांधले. मात्र, घाटघर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले. त्यामुळे ही वास्तू मोडकळीस आली आहे. घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांनी हे विश्रामगृह नगरच्या जलसंपदा विभागाकडे वर्ग केले.

निधी नसल्याने त्यांनीही त्याचे नुतनीकरण केले नाही. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने, ही वास्तू आम्हाला द्यावी म्हणून प्रस्ताव केला. मात्र, सरकारच्या वेळकाढू भूमिकेमुळे ही वास्तू तशीच पडून राहिल्याने पूर्णपणे खराब झाली आहे.

पर्यायाने या वास्तूपासून मिळणारा महसूल बुडाला आहे. संबंधित खात्याकडे ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर ही वास्तू विकसित केली, तर भंडारदऱ्याच्या वैभवात भर पडेल. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नान्नोर यांनी याबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार केल्याचे म्हटले आहे. 

हेही वाचा..

शेतकरी- शास्त्रज्ञांमधील समन्वय गरजेचा

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ५४ शेतकरी-शास्त्रज्ञ मंच कार्यरत असून, सतराशे शेतकरी त्याचे सदस्य आहेत. याद्वारे विद्यापीठाच्या विकसित तंत्रज्ञानाचा प्रसार वाढविणार असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.

ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, सहयोगी संशोधन संचालक, समन्वयक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी डॉ. शरद गडाख म्हणाले, की शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य विद्यापीठाचे एक प्रकारचे राजदूत असून, तंत्रज्ञान प्रसारासाठी त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व समन्वयकांनी ऑनलाइन मार्गदर्शनाद्वारे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.

या वेळी डॉ. मिलिंद देशमुख यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान डॉ. नंदकुमार कुटे यांनी तूर उत्पादन तंत्रज्ञान, डॉ. राजेंद्र वाघ यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान आणि डॉ. विनायक जोशी यांनी खरीप कांदा उत्पादन तंत्रज्ञान या विषयांवर मार्गदर्शन केले.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com