महसूलमंत्र्यांच्या मतदारसंघाचे कोविड मुक्तीचे स्वप्न भंगले, पुन्हा वाढले रुग्ण

कोवीडच्या पार्श्वभुमिवरील कठोर निर्बंध शिथील झाल्यानंतर शहरातील विविध दुकानांमध्ये तालुक्यातील खरेदीदारांची गर्दी वाढू लागली आहे.
balasaheb thorat 1.jpg
balasaheb thorat 1.jpg

संगमनेर : गेल्या काही दिवसात उत्तरोत्तर कमी होणाऱ्या कोवीड रुग्णसंख्येमुळे संगमनेर(Sangamner) तालुका व शहर कोवीडमुक्तीच्या दिशेने मार्गाक्रमण करीत होते. मात्र यामुळे मिळालेला दिलासा व समाधान फार काळ टिकले नाही. तीन आठवड्यानंतर काल शहरातील 19 जणांसह तालुक्यातील एकूण 71 अहवाल पॉझिटीव्ह आल्याने सर्वांना धक्का बसला आहे. (Kovid's dream of liberating the constituency of the revenue minister was shattered, the number of patients increased again)

कोवीडच्या पार्श्वभुमिवरील कठोर निर्बंध शिथील झाल्यानंतर शहरातील विविध दुकानांमध्ये तालुक्यातील खरेदीदारांची गर्दी वाढू लागली आहे. कोविडचे निर्बंध सैल झाले असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतही नागरिक गाफील झाले आहेत. तालुक्यातील आडबाजूच्या गावातील विवाहसोहळे व इतर कार्यक्रमांना न कळत गर्दी वाढी लागल्याचा परिणाम पुढे येण्यास सुरवात झाली आहे.

या महिन्याच्या पाच तारखेपासून तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होण्यास सुरवात झाली होती. सोमवार ( ता. 21 ) रोजी तर शहरातील रुग्णसंख्या शून्य असल्याने संगमनेरकरांना सुखद दिलासा मिळाला होता. मात्र ते समाधान अवघे 24 तासही टिकले नाही. आज शासकीय प्रयोगशाळेच्या 53, खासगी प्रयोगशाळेच्या 11 व रॅपिड अँटीजेनच्या सात अहवालातून तालुक्यातील एकूण 71 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आजच्या एकूण अहवालातून तालुक्यातील 27 गावे आणि वाड्यावस्त्यांमधून 52 तर शहरातून 19 जणांना कोविडची लागण झाली असून तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 22 हजार 720 झाली आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील 265 जणांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, या मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

हेही वाचा...

मानसिक आरोग्यासाठी योगसाधनेचा उगम

संगमनेर : वैयक्तिक आयुष्यातील ताणतणावातून मुक्त राहून आनंदी जीवन जगण्यासाठी आपले मन आणि शरीर सुदृढ राहणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा त्याचा विपरीत परिणाम मनुष्य जीवनावर होत असतो. मानसिक, शारीरिक व्याधींपासून मुक्ती मिळवण्यासाठी नित्यनियमाने योग, प्राणायाम करणे आवश्यक आहे. योगसाधनेचा उगम मानवाचे मानसिक आरोग्य समोर ठेवून झाल्याचे प्रतिपादन योग विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र वामन यांनी केले.

संगमनेर महाविद्यालयात ताण-तणाव व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते.

प्राचार्य डॉ. गायकवाड म्हणाले, की दैनंदिन कामकाज व वैयक्तिक कारणामुळे ताण तणाव निर्माण होतात. जीवनात वेळ व कामाचे योग्य नियोजन करुन, सकारात्मक विचार ठेवल्यास मानसिक सुख व समाधान लाभते तसेच ताण-तणाव, चिंता, भय, दुःख याचा कोणताही परिणाम आपल्या जीवनशैलीवर होत नाही, उलट आपला जीवनप्रवास सहज व सुकर होतो. प्रास्ताविक प्रबंधक संतोष फापाळे यांनी केले, सुत्रसंचालन व आभार समन्वयक विजय पाटील यांनी मानले.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com