कोविड प्रकोपात जनतेसोबत राहिलो : आमदार आशुतोष काळे

कोविडच्या दोन्ही लाटेत गावोगाव फिरून, आपण सदैव जनतेसोबत राहिलो.
Ashutosh Kale.jpg
Ashutosh Kale.jpg

कोपरगाव : मतदारसंघात समतोल विकासाचा वेग कायम ठेवीत, आपण कोविड (Covid) प्रकोपात सदैव जनते सोबत राहिलो. तातडीने पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर व ग्रामीण रूग्णालय मिळून दोन आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. तिस-या लाटेच्या मुकाबल्यासाठी आपण सज्ज आहोत. मात्र जनतेने मास्कचा वापर, सुरक्षीत अंतर व लसीकरण या त्रिसूत्रीचा वापर करून तिसरी लाट टाळावी, असे अवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले. (Kovid stayed with the people in the outbreak: MLA Ashutosh Kale)

जिल्हा परिषद वार्षिक योजनेअंतर्गत डाऊच खुर्द येथे बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण व चांदेकसारे येथे बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळा इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी सभापती पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, अनुसया होन, अनिल कदम, ॲड. राहुल रोहमारे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, रोहिदास होन, गौतम बँकेचे उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे, सरपंच संजय गुरसळ, उपसरपंच स्वाती रणधीर आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, की कोविडच्या दोन्ही लाटेत गावोगाव फिरून, आपण सदैव जनतेसोबत राहिलो. तालुक्यातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेऊन साडेचार वर्षापूर्वी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत कौल दिला. हा विश्वास सार्थ ठरवीत आपण प्रत्येक गावात विकासकामांचा वेग कायम ठेवला. विधानसभा निवडणुकीतही जनतेने विश्वास ठेऊन आमदारकी बहाल केली. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न आपण मार्गी लावला. विकासकामात कधीही गटातटाचे राजकारण आणले नाही.

कोपरगावचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविणार

गोदावरी कालव्यांचे रुंदिकरण करून कालव्याच्या शेवटच्या टोकाच्या गावांपर्यत शेतीसाठी पुर्णदाबाने पाणी देणे व कोपरगाव शहराचा पिण्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे, ही दोन महत्वाची कामे मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे.

- आमदार आशुतोष काळे

हेही वीचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com