लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सिंचन व्यवस्थेचा खेळखंडोबा, कोल्हे यांचा आरोप

गोदावरी कालव्यांना शेतीसाठी आवर्तन कधी सोडण्यात येणार याकडे शेतकरी डोळे लावून बसले असतांना अदयापही आवर्तन सुटत नसल्याने लाखो रूपये खर्च करून शेतात उभी असलेली पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत.
Snehalata kolhe.jpg
Snehalata kolhe.jpg

कोपरगाव : गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून जात असतांना लोकप्रतिनिधिंच्या दुर्लक्षामुळे सिंचन व्यवस्थेचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला असून, शेतकऱ्यांची पिके हातातून गेल्यावर आवर्तन सुटणार का? असा संतप्त सवाल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला.

कोल्हे म्हणाल्या, की गोदावरी कालव्यांना शेतीसाठी आवर्तन कधी सोडण्यात येणार याकडे शेतकरी डोळे लावून बसले असतांना अदयापही आवर्तन सुटत नसल्याने लाखो रूपये खर्च करून शेतात उभी असलेली पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. लोकप्रतिनिधींच्या सिंचन व्यवस्थेकडॆ झालेल्या दुर्लक्षामुळे आवर्तन सुटण्यास उशीर झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिके जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हाती आलेली पिके जळून गेल्यावर शेतीचे आवर्तन सुटले, तर त्याचा फायदा होणार का? हाही प्रश्नच असल्याचे कोल्हे म्हणाल्या.

येत्या 13 तारखेला दोन रोटेशन सुटणार असल्याचे सांगितले जात आहे. पिकांना पाण्याची आवश्यकता असतांना पिके जळू दयायचे आणि नुकसानीनंतर एकाच वेळी दोन आवर्तने देउ म्हणून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे.

मागील सरकारच्या काळात कालवा सल्लागार समितीच्या बैठका मंत्रालयात होतात, म्हणून मोठे आकाडतांडव केले, या सरकारच्या काळात मतदार संघात बैठका घेउन सत्कार घडवुन थाटमाट केला, मात्र सिंचनाच्या आवर्तन विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून येथील शेतकरी वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे.

आवर्तन विषयावर टोलवाटोलवी केली, त्याचवेळी शेतकऱ्यांविषयीचे तुमचे बेगडी प्रेम उघडे झाले आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठका दिल्लीत घ्या, मुंबईत घ्या अन्यथा कुठेही घ्या. पण शेतकऱ्यांना वेळेवर आवर्तने दया, अशी आर्त हाक शेतकरी करत असल्याने त्यांना भुलविण्याचे पाप आता करू नये, असेही कोल्हे म्हणाल्या.


हेही वाचा..

रेमिडीसीविर' इंजेक्शनचा काळाबाजार

कोपरगाव : कोरोना आजारावर रुग्णाला प्रभावी ठरणारे 'रेमिडीसीविर' इंजेक्शनची विक्री मेडिकल तथा एजन्सी मार्फत सुरू आहे. मात्र ह्या इंजेक्शनची वाढती मागणी बघता बऱ्याच फार्मसी द्वारे रेमीडीसिवीरचा काळा बाजार केला जात आहे. रुग्णांची होत असलेली लूट ही पूर्णपणे चुकीची असून, अशा प्रकारची थेट विक्री बंद करून प्रशासकीय यंत्रणे द्वारेच करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी केली आहे.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com