कोरोना काळात लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत, आता खावटी त्यांच्या हस्ते नकोच - Khawati grants will not be accepted by the people's representatives | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना काळात लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत, आता खावटी त्यांच्या हस्ते नकोच

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 जुलै 2021

गेल्या अनेक वर्षांपासून खावटी योजना बंद होती. ती कोरोनानंतर सुरु करण्यासाठी एकलव्य संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य सरकारने संघटनेची मागणी मान्य केली.

श्रीरामपूर : आदिवासी खावटी अनुदान वाटपाचा कुठल्याही राजकीय नेत्यांनी श्रेय घेवू नये. कोरोना काळात आदिवासी समाजाला उपासमारीचा सामना करावा लागला. आदिवासी समाजाचे कार्यकर्ते वगळता इतर कुठलेही राजकीय पुढारी संकट काळात आदिवाशी पाड्यामध्ये फिरकले नाही. (Khawati grants will not be accepted by the people's representatives)

गेल्या अनेक वर्षांपासून खावटी योजना बंद होती. ती कोरोनानंतर सुरु करण्यासाठी एकलव्य संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य सरकारने संघटनेची मागणी मान्य केली. त्याबद्दल संघटना राज्य सरकारची आभारी आहे. परंतु स्थानिक राजकीय पुढारी आदिवासी समाजासाठी कवडीचीही मदत करीत नाही. परंतु आदिवासी समाजासाठी सरकारी योजना आल्यानंतर लगेच आपणच ही योजना आणल्याचा देखावा करतात. त्याचा निवडणुकीत आदिवासी समाजाच्या मतांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. असे लोप्रतिनिधी व राजकीय पुढाऱ्यांचा एकलव्य संघटना निषेध करते. तसेच खावटी अनुदानातील किराणा किट हे आदिवासी कार्यालयातील संबंधीत अधिकाऱ्यांमार्फत वाटप करावे. अन्यथा आदिवासी समाज बांधव लोकप्रतिनिधींच्या हस्ते खावटी अनुदानाची किराणा किट स्विकारणा नसल्याची भुमिका एकलव्य संघटने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे.

या संदर्भात संघटनेची नुकतीच बैठक पार पडली असून, बैठकीला संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष अनिल मोरे, तालुकाध्यक्ष सुभाष मोरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष देविदास माळी, टायगर फोर्सचे तालुकाध्यक्ष मारुती बर्डे, युवा तालुकाध्यक्ष कृष्णा बर्डे, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना शेख उपस्थित होते.

 

हेही वाचा..

रस्त्यासाठी ग्रामस्थांचा ‘रास्ता रोको’

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील खडके- मडके व प्रभुवाडगाव येथील ग्रामस्थांनी खडके-मडके ते प्रभुवाडगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेवगाव-गेवराई मार्गावरील गदेवाडी फाटा येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. बी. कांबळे यांनी दुरुस्तीचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बब्रू वडघणे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. अमोल फडके यांनी, रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत सोबत राहू, असे आश्वासन दिले. युवक काँग्रेसचे बब्रू वडघणे यांनी, जिल्हा परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींची उदासीनता हा रस्त्याचा प्रमुख अडथळा असल्याचे सांगून, आतापर्यंत अनेक वेळा लोकप्रतिनिधींनी रस्ताकामाची उद्‍घाटने केली; परंतु काम सुरू झाले नसल्याचा आरोप केला.

दरम्यान, पंचायत समितीतील बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. बी. साळवे यांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शहराध्यक्ष किशोर कापरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष सचिन काळे, उपसरपंच दीपक बटुळे, हरिभाऊ वडघणे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सोपान घोरतळे, जगदीश वडघणे, भूषण वडघणे, योगेश वडघणे उपस्थित होते.

 

हेही वाचा...

कोपरगावमध्ये भाजपला धक्का

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख