शिर्डीतील जम्बो कोविड सेंटरमळे अनेकांच्या पोटात दुखू लागले ! खासदार लोखंडे यांची टीका - The Jumbo Covid Center in Shirdi has caused stomach aches for many! Criticism of MP Lokhande | Politics Marathi News - Sarkarnama

शिर्डीतील जम्बो कोविड सेंटरमळे अनेकांच्या पोटात दुखू लागले ! खासदार लोखंडे यांची टीका

विलास कुलकर्णी
मंगळवार, 11 मे 2021

शिर्डी येथे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करीत आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे.

राहुरी : शिर्डी येथे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करीत आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे, अशी टीका खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांचे नाव न घेता केली. (The Jumbo Covid Center in Shirdi has caused stomach aches for many! Criticism of MP Lokhande)

जम्बो कोविड सेंटरमध्ये विनामुल्य उपचार करण्यात येणार आहेत. प्लेगच्या साथीत साईबाबा रुग्णांची सेवा करत होते. आता, साईबाबा संस्थान ट्रस्ट रुग्णांची सेवा करणार आहे, असेही ते म्हणाले.

देवळाली प्रवरा येथे योगा भवन बांधण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 80 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. देवळाली प्रवरा पालिकेच्या सभागृहात खासदार लोखंडे यांनी निधी मंजुरीचे पत्र उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे व माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्याकडे सुपुर्द केले. अमोल कदम, भारत शेटे, सुनिता थोरात, बाळासाहेब खुरुद, सुनिल कराळे, तुषार शेटे, बन्सी वाळके, सुरेश मोटे, सुनिल गोसावी उपस्थित होते.

हेही वाचा..

रक्षक बनला भक्षक

खासदार लोखंडे म्हणाले, "निरोगी, सुदृढ शरीरासाठी नियमित योगा करणे काळाची गरज आहे. योगासने करण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. लोकांच्या मनात भरेल. अशी योगा भवनाची सुंदर वास्तू बांधावी."
माजी आमदार कदम म्हणाले, "शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज माफी दिली. त्यापेक्षा जास्त कर्ज असलेले शेतकरी थकबाकीत गेले आहेत. त्यांचे कर्ज माफ करावे. थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज मिळावे." 

 

हेही वाचा..

कोरोना काळातही मापात पाप..

मिरजगाव : लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले, अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत गरीब नागरिकांना आधार मिळावा, गरजूंना मदत व्हावी, एकही माणूस उपाशी राहू नये, यासाठी शासनाने रेशनिंग दुकानांच्या माध्यमातून अत्यल्प दरात अन्न धान्य पुरविण्याचे काम सुरु केले आहे. मात्र काही अपवादात्मक दुकानदार सोडले, तर परिसरातील  बहुतांश स्वस्त धान्य दुकानदार सामान्य नागरिकांची विविध प्रकारे अडवणूक करताना दिसत आहेत. अनेक लाभार्थ्यांना शासनाचे नियम व ग्राहक हक्क माहिती नसतात. याचाच गैरफायदा 
दुकानदार घेताना दिसत आहेत.

इलेक्ट्रोनिक वजन काटा न वापरता साधा वजन काटा वापरणे, माल कमी देणे, घेतलेल्या मालाची रीतसर पावती न देणे, मागील महिन्याचा माल न देणे, दुकाने नियमित चालू न ठेवणे, दुकानांवर स्पष्टपणे वाचता येईल, असा माहिती फलक नसणे, स्प्ष्ट्या फलकावर दुकानाची वेळ, सुटीचा दिवस, मालाचा भाव व देय प्रमाण यांचा स्पष्ट उल्लेख नसणे, तक्रार वही उपलब्ध नसण, अशा तक्रारी नागरिक करीत आहेत.

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख