जयंत पाटील यांचे नगर जिल्ह्यावर लक्ष : एका भाच्याला केले मंत्री; घुलेंच्या जावयाला साईसंस्थान! - Jayant Patil's big wave! One nephew became a minister, the other nephew became the president of Sai Sansthan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

जयंत पाटील यांचे नगर जिल्ह्यावर लक्ष : एका भाच्याला केले मंत्री; घुलेंच्या जावयाला साईसंस्थान!

मुरलीधर कराळे
बुधवार, 23 जून 2021

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी ऊषा तनपुरे, तर माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या पत्नी नीलिमा या जयंत पाटल यांच्या भगिणी आहेत.

नगर : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे नगर जिल्ह्यावर लक्ष आहे. भाचे असलेल्या प्राजक्त तनपुरेंना मंत्रीपद दिले, तर बहिणीच्या पुतणीचे पती असलेल्या आमदार आशुतोष काळे यांना साई संस्थानचे अध्यक्षपद बहाल केले जात आहे. या वर्षीची सर्वात मोठी ओवाळणी या निमित्ताने दोन्ही घरांना मिळणार आहे. (Jayant Patil's big wave! One nephew became a minister, the other nephew became the president of Sai Sansthan)

जयंत पाटलांचे नगरला कायम येणे-जाणे असते. त्यांच्या दोन्ही बहिणी नगर जिल्ह्यात आहेत. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या पत्नी उषा तनपुरे, तर माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या पत्नी नीलिमा या जयंत पाटलांच्या भगिनी आहेत. नरेंद्र घुले हे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे भाऊ आहेत. चंद्रशेखर घुले यांची कन्या चैताली या आमदार आशुतोष काळे यांची पत्नी आहेत. 

राज्यपातळीवर नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडीत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे अध्यक्षपद काॅंग्रेसला मिळाले आहे. राष्ट्रवादीला शिर्डी येथील साईसंस्थानचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार काळे यांना हे पद मिळाले आहे.

दरम्यान, जागतिक पातळीवर नाव असलेल्या साईसंस्थानचे अध्यक्षपद मिळण्यासाठी मोठ्या राजकीय घडामोडी होत असतात. या पदावर राज्यातून निवड होत असल्याने या पदासाठी खेचाखेची सुरू असते. काल या पदाबाबत अंतीम निर्णय झाल्यानंतर कोपरगावमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

मंत्री जयंत पाटलांच्या नातेवाईकांवर कृपा झाल्याने नगर जिल्ह्याला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. असे असले, तरी काही नेते मात्र नाराज झाल्याचे समजते.

 

हेही वाचा..

काळे यांचे नाव पुढे येताच आतिषबाजी

 

हेही वाचा..

शिर्डी देवस्थान राष्ट्रवादीकडे, तर पंढरपुरचे काॅंग्रेसकडे

 

हेही वाचा..

जगातील लोक साईबाबांना साकडे घालतात अन इथले नेत्यांना

 

हेही वाचा..

साईसंस्थानवर स्थानिकांनाच प्राधान्य हवे

 

हेही वाचा..

साईसंस्थानवर प्रताप ढाकणे यांना संधी मिळावी

 

हेही वाचा..

महाविकास आघाडीसमोर नवे विश्वस्तमंडळ निवडण्याचे आव्हान

 

हेही वाचा..

साईबाबा संस्थानवर दोन्ही काॅंग्रेसचा दावा

 

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख