माझ्यामुळेच पिंपळगाव जोगाचे आवर्तन, खासदार विखे, आमदार लंके या दोघांचाही दावा

पिंपळगांव जोगा धरणाच्या अवर्तनासंदर्भात खासदार डॉ. सुजय विखे व आमदार निलेश लंके, यांच्यात अलिकडेच कलगीतुरा रंगलेला होता.
Lanke and Dr. vikhe.jpg
Lanke and Dr. vikhe.jpg

पारनेर : पिंपळगांव जोगा धरणाच्या अवर्तनासंदर्भात खासदार डॉ. सुजय विखे व आमदार निलेश लंके, यांच्यात अलिकडेच कलगीतुरा रंगलेला होता.

काल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत खासदार सुजय विखे, आमदार निलेश लंके, जुन्नरचे आमदार वल्लभ बेनके तसेच पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभयंता प्रशांत कडूस्कर यांच्यासह इतर अधिका-यांची ऑनलाईन बैठक झाली. या वेळी पिंपळागाव जोगाचे एक आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
नंतर व्हिडीओ कॉन्फरन्स होऊन शुक्रवारी रात्री पाणी सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

आवर्तन आमदार लंके यांच्या पुढाकारामुळेच सुटले, असा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर डॉ. विखे यांच्याही कार्यालयाने तसे कळविले आहे. त्यामुळे आवर्तनाचे श्रेय नेमके कोणाला, असा प्रश्न उपस्थीत झाला आहे. आवर्तनाचे श्रेय कोणालाही जावो पारनेरच्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याने तालुक्यातील पिंपळगाव जोगा आवर्तनाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावऱण निर्माण झाले तयार आहे.

मागील आवर्तन सुटले, त्यावेळी तालुक्यातील गावांपर्यंत ते पोहचलेच नाही. अवर्तनाच्या भरवशावर असलेली पिके व फळबागांना त्याचा मोठा फटका बसला. अवर्तन संपले तरी पाणी मिळाले नाही. त्या मुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते.

आमदार लंके यांनी यासंदर्भात पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय दुर करण्याची मागणी केली होती. पाटबंधारेचे अधिकारी तसेच मंत्री पाटील यांनी या प्रश्‍नावर सकारात्मक निर्णय घेऊन पारनेरसाठी विशेष आवर्तन सोडण्याचे मान्य केले होते.

दरम्यान, अळकुटी येथे डॉ. विखे यांनीही पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून अवर्तन सोडण्यासंदर्भात सुचना दिल्या होत्या. त्यानंतर लंके यांनी डॉ. विखे यांनी पारनेरच्या पाणी प्रश्‍नात लुडबूड करू नये, आम्ही आमचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सक्षम आहोत. असा इशारा दिला होता. त्यावर विखे यांनीही हिंमत असेल तर पुणे जिल्हयातील नेत्यांशी संघर्ष करा, असे प्रत्युत्तर दिले होते. 

पिंपळगाव जोगाचे टेल टू हेड असे 22 दिवसांचे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला आहे. पहिले नऊ दिवस पारनेर तालुक्यासाठी पुर्ण दाबाने पाणी देण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील गावांना पाणी देण्यात येणार आहे.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com