इंदोरीकर महाराज निर्दोष, ही पांडुरंगाचीच कृपा - Indorikar Maharaj is innocent, this is the grace of Panduranga: Madhukar Pichad | Politics Marathi News - Sarkarnama

इंदोरीकर महाराज निर्दोष, ही पांडुरंगाचीच कृपा

शांताराम काळे
गुरुवार, 8 एप्रिल 2021

अकोले : मी आजारातून केवळ हा क्षण पाहण्यास बाहेर आलो, ती पांडुरंगाची कृपाच आहे.

अकोले : मी आजारातून केवळ हा क्षण पाहण्यास बाहेर आलो, ती पांडुरंगाची कृपाच आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केले.

आपत्यप्राप्तीबाबत न्यायालयाने निवृत्ती देशमुख महाराज (इंदोरीकर) यांना निर्दोष ठरविले. त्याबद्दल इंदोरीकर महाराज व त्यांचे वकिल ऍड . के . डी . धुमाळ यांचा सत्कार नुकताच माजीमंत्री पिचड यांनी केला. त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी माजी आमदार वैभव पिचड, वकील वसंत मनकर, दीपक महाराज देशमुख , अकोले वकील बार असोशिएशन अध्यक्ष भाऊसाहेब गोडसे, भाऊसाहेब वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक दीपक महाराज देशमुख यांनी केले.

पिचड म्हणाले, की राज्याच्या नव्हे, तर देशाच्या पटलावर अध्यात्मिक क्षेत्रात ज्यांनी आपले नाव कोरून विठ्ठल हरीनामाचा जयघोष करत प्रबोधन करताना व्यसनमुक्ती चळवळ उभारण्याचे काम ज्यांनी केले, तर आपले बुद्धी चातुर्याने निकाल लावून इतिहास घडवला. 

निकाल लागल्यानंतर राज्यातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सत्य हे सत्यच असते, फक्त त्याला वेळ काळ यावे लागते. असे सांगताना गोवारी हत्याकंड, व महादेव कोळी याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची इतिहासात नोंद होईल, असेही ते म्हणाले.

माजी आमदार वैभव पिचड म्हणाले, की इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनात त्याच्या जिभेवर सरस्वती वास करते, त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी अध्यात्मिक सेवेचे वेड लावले. तर के . डी. अण्णा यांनी आपल्या कामातून इतिहास घडविला आहे. या पुढील काळात अशी केस घडली, तर या केसचा दाखल प्रत्येकजण देईल, हे विसरता काम नये. महाराजांच्या पाठीमागे एकटा तालुका नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट उभा राहिला हे विशेष.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख