माझी झोप उडालीय, मंत्र्यांनाही झोपू देणार नाही

मंत्र्यांनाही झोपू देणार नाही. कोरोना काळातही शेतकऱ्यांसाठी माझे आंदोलन सुरू होते. जनतेच्या प्रश्‍नांना उत्तरे न देता आल्याने सध्याचे सरकार कोरोनाच्या आडोशाला बसलेले आहे.
Sadabhau Khot.jpg
Sadabhau Khot.jpg

बोटा (संगमनेर) : ‘‘दुधाला मिळणारा मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे मी शांतपणे झोपू शकत नाही. मंत्र्यांनाही झोपू देणार नाही. कोरोना काळातही शेतकऱ्यांसाठी माझे आंदोलन सुरू होते. जनतेच्या प्रश्‍नांना उत्तरे न देता आल्याने सध्याचे सरकार कोरोनाच्या आडोशाला बसलेले आहे,’’ असा आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केला. (I will not let even the ministers sleep)

खोत काल साकूर (ता. संगमनेर) येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते. ते म्हणाले, ‘‘माझे अंगण हेच आंदोलनाचे रणांगण आहे. झोपडीतील कार्यकर्ता भला मोठा वाडा पाडू शकतो. त्यांच्या बुडाखाली सत्तेची ऊब असल्याने त्यांना बसक्या झाला आहे. शेतकी कामात आजही मी मंत्र्यांना सरसच आहे.’’

धनगर आरक्षणाविषयी २३ जाती एकत्र येऊन लढा देतात, याचेही त्यांनी कौतुक केले. त्यांनी एकीकडे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांना हात घातला, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे येथील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी जमलेल्या गर्दीबद्दल ताशेरेही ओढले.
 

हेही वाचा..

श्रेष्ठींशी चर्चा करून आघाडीबाबत निर्णय

राहुरी : देवळाली प्रवरा येथे विविध कार्यकारी सेवा संस्था व नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, अशा लढतीच्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या बैठकीत सोसायटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करण्यास हिरवा कंदील दाखविला. परंतु, नगरपालिका निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर निर्णय घेण्याचे ठरले.

देवळाली प्रवरा शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेश सदस्य अजित कदम यांच्या निवासस्थानी पार पडली. शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, नगरसेवक शैलेंद्र कदम, अप्पासाहेब कोहकडे, मच्छिंद्र मुसमाडे, गोवर्धन शेटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत देवळाली प्रवरा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी एकत्रित निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मागील नगरपालिका निवडणूक भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस पक्षांनी स्वतंत्र लढविली. त्यामुळे, आगामी नगरपालिका निवडणूक महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना सोबत घेऊन लढवावी अथवा स्वतंत्र स्वतंत्र, याबाबत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर निर्णय घ्यावा, असे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.

शहराध्यक्ष चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नगरसेवक शैलेंद्र कदम यांनी पालिकेतील एकमेव विरोधी नगरसेवक म्हणून भूमिका बजावतांना सुधारित वाढीव पाणीपुरवठा योजनेत पालिकेचे दोन कोटी रुपये वाचविल्याचे सांगितले.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com