मी वृक्ष पाहायला आलो होतो; पण वृद्ध भेटले : बच्चू कडू - I had come to see the tree; But the old man met: Bachchu Kadu | Politics Marathi News - Sarkarnama

मी वृक्ष पाहायला आलो होतो; पण वृद्ध भेटले : बच्चू कडू

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 मे 2021

मी वृक्ष पाहायला आलो होतो; पण वृद्ध भेटले. वृक्षाची जपवणूक करून त्याची काळजी घेणे हे जसे राष्ट्र कार्यासारखे आहे.

नेवासे : "मी वृक्ष पाहायला आलो होतो; पण वृद्ध भेटले. शासनाच्या मदतीशिवाय वृद्धाश्रम सुरू असल्याबद्दल कौतुक करत शरणपूर वृद्धाश्रमाच्या जागेचा व अनुदानाचा प्रश्न स्वत: लक्ष घालवून सोडवू, अशी ग्वाही देऊन, वृद्धांमुळे घर-परिवार टिकून असल्याने त्यांना जपा,'' असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व राज्याचे जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केले. (I had come to see the tree; But the old man met: Bachchu Kadu)

मंत्री कडू नगरहून औरंगाबादकडे जात असताना त्यांनी नेवासे फाटा येथील शरणपूर वृद्धाश्रमाला बुधवारी (ता. 12) रात्री भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कडू म्हणाले, ""मी वृक्ष पाहायला आलो होतो; पण वृद्ध भेटले. वृक्षाची जपवणूक करून त्याची काळजी घेणे हे जसे राष्ट्र कार्यासारखे आहे, तसेच वृद्धांना जपले तर परिवारही एकसंध राहतो. यासाठी प्रत्येकाने वृद्धांना जपण्याचे काम करावे.''

कडू यांनी शरणपूर वृद्धाश्रमाला रोख दहा हजारांची मदत दिली. वृद्धाश्रमाचे संचालक रावसाहेब मगर यांनी कडू यांचे स्वागत केले. बाळासाहेब देवखिळे, सुरेश उभेदळ, भिवाजी आघाव, "प्रहार'चे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, अजय बारस्कर, रूपेंद्र काले उपस्थित होते. 
 

हेही वाचा...

स्वस्त धान्य प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल 

राजूर : तालुक्‍यातील राजूर येथे काल (ता. 12) दुपारी एक वाजेच्या सुमारास कोल्हार-घोटी रस्त्यावर राजूर पोलिसांनी चार स्वस्त धान्याचे ट्रक ताब्यात घेतले होते.

याप्रकरणी आज चौघांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांनी दिली. 
तालुक्‍यातील आदिवासी भागात स्वस्त धान्य घेऊन निघालेले चार ट्रक राजूर पोलिसांनी संशय आल्याने ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र चालकांना कुठलीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी धान्य व ट्रक, असा 56 लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. हे ट्रक राजूर पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले होते. 

हेही वाचा...

खासगी डाॅक्टरांनी माणुसकी दाखवावी

तहसीलदार मुकेश कांबळे यांना याप्रकरणी कळविण्यात आले होते. आज सायंकाळी सहा वाजता राजूर पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी विजय सदाशिव फटांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हौशिराम दिनकर देशमुख (रा. केळुंगण, ता. अकोले), साई संदेश धुमाळ (रा. धुमाळवाडी, ता. अकोले), योगेश राजेंद्र धुमाळ (रा. अकोले), अशोक हिरामण देशमुख (रा. केळुंगण, ता. अकोले) यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलिस उपनिरीक्षक नितीन खैरनार, पोलिस कर्मचारी देविदास भडकवार, अशोक गाढे यांनी ही कारवाई केली होती. 

 

 

 

Edited By - Murlihar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख