डाॅ. लहामटे का म्हणाले, मी पळकुटा आमदार नाही

आगस्तीकारखान्याच्याप्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्याकडे चर्चा केली असून, त्यांनीकारखाना काटकसरीने चालवावा, अशी सूचना केली असल्याचे आमदार लहामटे म्हणाले.
kiran lahamte.jpg
kiran lahamte.jpg

अकोले : मी पळकुटा नाही. मुंबईला महत्वाच्या कामाला गेलो होतो. माझ्या वर टीका करणारांनी आत्मपरीक्षण करा, कोण आदिवासीच्या बाजूचे अन विरोधी कळेल, असे आमदार डॉ. किरण लहामटे (Dr. Kiran Lahamte) यांनी म्हटले आहे. (I am not a runaway MLA)

अकोले येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अमित नाईकवाडी, भागवत शेटे, संतोष नाईकवाडी, संदीप शेणकर, हरिभाऊ फापाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आगस्ती कारखान्याच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चर्चा केली असून, त्यांनी कारखाना काटकसरीने चालवावा, अशी सूचना केली असल्याचे आमदार लहामटे म्हणाले. अकोले तालुक्यात लवकरच उपजिल्हा रुग्णालय, देवीच्या घाटाचे काम, ऑक्सिजन प्रकल्प व बिताका प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.

डॉ. लहामटे म्हणाले, की अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरासमोर निदर्शने केली. निषेध केला. मी पळकुटा असल्याचे म्हणाले. याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार लहामटे म्हणाले की, मी पळकुटा नाही. मुंबईला महत्वाच्या कामाला गेलो होतो.

घुसखोरीबाबत नागपूर व मुंबई येथील अधिवेशनात मी बोललो आहे. या वेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, आदिवासी आरक्षणाबाबत अजित पवार यांनी कोणत्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही, असे स्पष्ट केल्याचे डॉ. किरण लहामटे म्हणाले.

हेही वाचा..

पुरस्कार जनतेला समर्पित : आमदार लंके

पारनेर : ‘कोरोना संकटात रुग्णांची केलेली सेवा विचारात घेऊन लंडन येथील ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने पुरस्कार देऊन सन्मान केला. हा सन्मान माझा एकट्याचा नसून, तो मतदारसंघातील प्रत्येकाचा आहे. हा पुरस्कार मी मतदारसंघातील जनतेला समर्पित करतो,’’ असे उद्‍गार आमदार नीलेश लंके यांनी मुंबई येथे पुरस्कार स्विकारताना काढले.

महाराष्ट्र राज्याच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स संस्थेच्या अध्यक्ष फराह अहमद यांनी आमदार लंके यांना हा पुरस्कार प्रदान केला. त्यावेळी लंके बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘आम्ही कोरोना संकटाच्या पहिल्या लाटेमध्ये सुमारे अडीच लाख वाटसरूंना जेवणाची सोय मोफत केली. चपला, औषधे, पाणी, चादरी पुरविल्या. कर्जुले हर्या येथे शरदचंद्र पवार कोविड सेंटर उभारून सुमारे साडेपाच हजार रुग्णांवर मोफत उपचार केले.

दुसऱ्या लाटेत तब्बल साडेदहा हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले. दरम्यान, एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही समाधानाची बाब आहे. समाजासाठी केलेल्या चांगल्या कामाची दखल लंडनच्या संस्थेने घेतली.’’ हा पुरस्कार आपण जनतेला समर्पित करीत आहोत, असेही लंके म्हणाले. दरम्यान, या पुरस्काराची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com